AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववर्ष 2026 मध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामने कधी? जाणून घ्या वेळापत्रक

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणी असते. भारत पाकिस्तान सामन्यांची मेजवानी 2025 वर्षात क्रीडाप्रेमींना मिळाली होती. आता पुढच्या वर्षी तसं काही होईल का? चला जाणून घ्या.

नववर्ष 2026 मध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामने कधी? जाणून घ्या वेळापत्रक
नववर्ष 2026 मध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामने कधी? जाणून घ्या वेळापत्रकImage Credit source: PTI/Tanvin Tamim/DRIK/Getty Images
| Updated on: Dec 27, 2025 | 9:09 PM
Share

भारत पाकिस्तान सामना असला की क्रीडाप्रेमी वेळ काढून हा सामना पाहतात. कारण हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी कोण सोडणार? 2025 या वर्षात भारत पाकिस्तान सामन्यांची पर्वणी क्रीडाप्रेमींनी अनुभवली. आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले होते. या तिन्ही सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात तर धाकधूक वाढली होती. कारण सुरुवातीला झटपट विकेट पडल्याने हा सामना पाकिस्तानच्या पारड्यात झुकला होता. पण तिलक वर्माने केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला विजयश्री खेचून आणता आला. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. आता 2026 या नव्या वर्षात भारत पाकिस्तान सामना कधी आहे ते जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप 2026

भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मिळेल. हा सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना कोलंबोच्या मैदानात होईल. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. टीम इंडियावर पाकिस्तानला पराभूत करण्याचा दबाव असणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या गटातून दोन संघांना पुढच्या फेरीत संधी मिळणार आहे.

अंडर 19 वर्ल्डकप 2026

झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशात अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. साखळी फेरीत भारत पाकिस्तान भिडणार नाही. पण उपांत्य किंवा अंतिम फेरीत भिडण्याची शक्यता आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला अमेरिकेशी होणार आहे.

14 जूनला पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडकडे आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे. स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होईल. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होईल. या सामन्याचं वेळापत्रक काही समोर आलेलं नाही. नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!