इंदोरीकर महाराजांच्या मुलाने कानपिळीमध्ये भाऊजींकडे मागितलं तब्बल 41 लाखांचं गिफ्ट, कृष्णाने नेमकी काय केली मागणी?

इंदोरीकर महाराज यांनी आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाट्यात केलं, मात्र या लग्नात केलेल्या खर्चामुळे इंदोरीकर महाराज चांगलेच चर्चेत आले आहेत. या लग्नाला राजकीय, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज लोकांनी उपस्थिती होती.

इंदोरीकर महाराजांच्या मुलाने कानपिळीमध्ये भाऊजींकडे मागितलं तब्बल 41 लाखांचं गिफ्ट, कृष्णाने नेमकी काय केली मागणी?
Indorikar Maharaj
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2026 | 6:56 PM

इंदोरीकर महाराज हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनाला भाविक प्रचंड गर्दी करतात. अनेकदा आपल्या कीर्तनांमधून केलेल्या वक्तव्यामुळे देखील इंदोरीकर महाराज हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून लोकांना नेहमी सल्ला देतात लग्न साधेपणाने करा, लग्नावर जास्त खर्च करू नका, साधी लग्न केली तरी मुलं होतात, असा सल्ला त्यांनी आपल्या कीर्तनातून अनेकदा दिला आहे. परंतु काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्यामध्ये इंदोरीकर महाराज यांनी प्रचंड खर्च केला. त्यामुळे इंदोरीकर महाराज चांगलेच चर्चेत आले. साखरपुड्यावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर अनेकांनी टीका केली. महाराज म्हणतात मुलांचं लग्न साधेपणाने करा मग त्यांनी का एवढा खर्च केला? असा सवालहील त्यावेळी अनेकांनी उपस्थित केला होता. दरम्यान साखरपुड्यावेळी झालेल्या टीकेनंतर इंदोरीकर महाराज यांनी भर किर्तनात जाहीर केलं होतं, की लग्न याहीपेक्षा मोठं करणार.

शेवटी महाराजांनी आपला शब्द खरा केला. रविवारी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचं ज्ञानेश्वरी देशमुख यांचं लग्न साहिल चिलप यांच्याशी पार पडलं. साहिल चिलप हे उद्योजग आहेत. या लग्नामध्ये इंदोरीकर महाराज यांनी प्रचंड पैसा खर्च केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे हा विवाहसोहळा पार पडला. तब्बल 100 एकरात या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आणि मंत्री देखील या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. हा विवाहसोहळा राज्यभरात चर्चेचला विषय ठरला.

दरम्यान लग्नामध्ये कानपिळीची एक प्रथा असते, ज्यामध्ये भाऊ आपल्या बहिणीच्या पतीचा लग्नावेळी कानपिळतो. कानपिळीच्यावेळी बहिणीचा भाऊ हा आपल्या भाऊजीकडे गिफ्ट देखील मागतो. दरम्यान इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात देखील इंदोरीकर महाराज यांचे चिरंजीव कृष्णा इंदोरीकर यांनी आपवले भाऊजी साहिल चिलाप यांचा कानपिळला. त्यावेळी त्यांनी आपल्या भाऊजीकडे तब्बल 41 लाख रुपयांचं गिफ्ट मागितलं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. कृष्णा यांनी आपले भाऊजी साहिल चिलप यांच्याकडे 41 लाख रुपयांची नवी फॉर्चुनर कार मागितली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us