
इंदुरीकर महाराज आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज कायम लग्नाबाबत त्यांच्या किर्तनात बोलताना दिसतात. साधे लग्न करण्याबाबत ते लोकांना सांगतात. मात्र, इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्यात इंदुरीकर महाराजांनी पैशांची मोठी उधळपट्टी केल्याचे पुढे आले. इंदुरीकर महाराजांच्या लेकीची आलिशान गाडी पुढे आणि त्यानंतर मागे मोठ्या गाड्यांचा ताफा बघायला मिळाला. हेच नाही तर पूर्ण रस्त्यावर फक्त आणि फक्त गाड्यांची मोठी रांगच दिसत होती. शाही पद्धतीने कार्यालयात महाराजाच्या लेकीचे आगमन झाले. एक नारा थाट महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात बघायला मिळाला.
साधी लग्न केल्यावरही मुले होतात म्हणणारे महाराज मात्र लेकीच्या साखरपुड्यात सर्वकाही विसरल्याचे स्पष्टपणे दिसले आणि त्यांच्यावर एकच टिकेची झोड उडाली. या साखरपुड्याला तोबा गर्दीही बघायला मिळाली. काही राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली. काही व्हिडीओ आणि फोटो या साखरपुड्यातील पुढे येत असून महाराजांनी बक्कळ पैसा लेकीच्या साखरपुड्यावर उधळल्याचे स्पष्ट दिसतंय. होणाऱ्या टिकेनंतर साखरपुडा थाटात करण्याचे कारणही त्यांनी सांगून टाकले.
आता इंदुरीकर महाराजांचा साखरपुड्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी ते उपस्थित लोकांचे स्वागत करताना दिसले. यादरम्यान बोलताना साखरपुड्यामध्ये आपण मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. इंदुरीकर महाराजांनी म्हटले की, आजच्या कार्यक्रमात मी ठरवले की, प्रत्येक कार्यक्रमात येणाऱ्या विशिष्ट लोकांना फेटे बांधली जातात आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणे यामध्ये बदल केला. थोडी लोक मला नाव ठेवतील.
आयुष्यातील 30 वर्षे मी लोकांनी नावे ठेवलेलीच मी सहन करत आलोय. पण आता बदल करत यापुढे ठरवले की, विशिष्ट व्यक्तीचा सत्कारच करायचा नाही. करायचा तर सर्वांचाच नाही तर एकाचाही नाही. म्हणून आजच्या कार्यक्रमात मी ठरवून टाकले की, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक मुर्ती द्यायची आणि ती मुर्ती देवघरात राहिल. हा बदल आपण कार्यक्रमात केला आहे आणि सत्कार हा विषय बंद केला आहे. या भाषणाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.