इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात फुलांवरच तब्बल इतका खर्च, पैशांची उधळपट्टी, थेट लाखाच्या…
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच झाला असून त्याचे काही व्हिडीओ आणि फोटो पुढे येत आहेत. या साखरपुड्यातील व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला. साधी लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण केली.

महाराष्ट्रात सध्या एकच विषय तूफान चर्चेत आहे तो म्हणजे फक्त प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा. इंदुरीकर महाराजांनी आपल्या लेकीचा ज्याप्रकारे थाटामाटात आणि अत्यंत आलिशान पद्धतीने साखरपुडा केला, त्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. हेच नाही तर वारकरी संप्रदायाकडूनही त्यांच्यावर टीका केली जातंय. इंदुरीकर महाराजांनी अनेकदा त्यांच्या किर्तनामध्ये लग्न साधी करा… साधी लग्न केल्यानेही मुले होतात, पैसा जपून ठेवा असा समाजाला उपदेश दिला. मात्र, दुसरीकडे स्वत: च्या मुलीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण केली. लेकीची मंगल कार्यालयात शाही एन्ट्री… गाड्यांचा मोठा ताफा… ओपन जिप आणि मुलीचा गाडीच्या बाहेर येत तो शाही थाट चर्चेचा विषय बनला.
फुलांनी सजवलेल्या गाडीतून महाराजांच्या लेकीची शाही एन्ट्री
इंदुरीकर महाराजाच्या लेकीच्या साखरपुड्यात अफाट गर्दी दिसली. काही राजकीय पुढाऱ्यांनीही या साखरपुड्याला हजेरी लावली. लेकीचा असा शाही साखरपुडा केल्याने इंदुरीकर महाराजांना जोरदार सुनावले जात आहे. लेकीचा साखरपुडा इतका जास्त मोठा करण्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. हेच नाही तर लेकीच्या साखरपुड्यानिमित्त शेतकऱ्यांना 1 लाख 11 हजार रुपयांची मदत त्यांनी केली.
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात तोबा खर्च
आता इंदुरीकर महाराज यांच्या लेकीच्या साखरपुड्यातील खर्चाबाबत एक अत्यंत मोठी बाब पुढे आलीये. संगमनेरच्या लॉन्समध्ये खास सजावट करण्यात आली होती. स्टेज अत्यंत खास पद्धतीने सजवण्यात आले. सर्वत्र फुलांच्या माळा फक्त दिसत होत्या. सजावटीसाठी इंदुरीकर महाराजांनी मोठा पैसा मोजला. ज्या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम होता, त्याठिकाणी फक्त आणि फक्त फुलांच्या माळा दिसत होत्या.
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यातील व्हिडीओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यात फुलांवरच एक लाखांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. स्टेज सजावट पूर्णपणे फुलांची केलेली होती. शिवाय त्यांच्या लेकीने जी कार्यालयात शाही एन्ट्री घेतली त्या कारही इतरही गाड्यांची सजावट फुलांनी केली होती. कार्यालयात जागोजागी फुलांची सजावट व्हिडीओमध्ये दिसतंय. फुलांच्या सजावटीवरच इंदुरीकर महाराजांनी लाखो रूपये खर्च केल्याची अंदाजा माहिती मिळत आहे.
