
समाज प्रभोधनकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार असलेल्या इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा संगमनेरमध्ये मोठ्या थाटात पार पडला, इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक असलेले साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. मात्र या कार्यक्रमावर प्रंचड पैशांची उधळपट्टी झाली असा आरोप करत सध्या अनेकजण इंदुरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. या टीकेला यापूर्वीच इंदुरीकर महाराज देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. या टीकेनं व्यथित होऊन किर्तन सोडून देतो असंही त्यांनी म्हटलं होतं. ‘माझ्यावर काय टीका करायची ती करा, पण माझ्या कुटंबापर्यंत जाण्याचं काम नव्हतं, काही जणांनी माझ्या मुलीच्या कपड्यांवरून टीका केली, पण साखरपुड्यात कोण कपडे घेतं, मुलाकडचे की मुलीकडचे?’ असा प्रश्नही त्यांनी किर्तनात केला होता, तसेच आता असं वाटतं बास झालं हे किर्तन, लवकरच फेटा खाली ठेवतो, असंही त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान त्यानंतर एका किर्तनात तर त्यांनी आपल्या टिकाकारांना चांगलंच सुनावलं, आता माझ्या मुलीचं लग्न हे मी साखरपुड्यापेक्षाही थाटात करणार असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आता संताप व्यक्त केला आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी जोरदार टीका केली होती, दुसऱ्याला साधेपणाने लग्न करण्याचा उपदेश देता, दुसऱ्याच्या लग्नाबद्दल बोलता मग तुमच्यावर तर टीका होणारच असं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान एका किर्तनामध्ये बोलताना इंदुरीकर महाराज यांनी आता या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. जर कोणी कष्टाचा पैसा मुलीच्या लग्नात खर्च केला तर लोकांना पोटदुखी होण्याचं कारण काय? नेत्यांच्या सभा होतात, तीस मिनिटाच्या सभेवर तीन कोटींचा खर्च होतो, ते मिडियावाले का दाखवत नाहीत? माझं त्यांना चॅलेंज आहे? त्यांनी ते पण दाखवावं असं यावेळी इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. इंदुरीकर महारजा यांनी आपल्या मुलीच्या लग्नाला केलेल्या खर्चावरून आता समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत, काही जण महाराजांचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काही जण त्यांच्यावर टीका देखील करत आहेत.