सुपर्ब… तिरुपतीसाठी रेल्वेचं पॅकेज! प्रवास, दर्शन, थ्री स्टार हॉटेल, कन्फर्म! ओक्केच की!!

| Updated on: Sep 07, 2022 | 11:54 AM

या पॅकेज टूरमध्ये नांदेड ते तिरुपती, तिरुपती ते परत नांदेडपर्यंत रेल्वेने प्रवास. तिरुपती येथे थ्रीस्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था. यासह इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.

सुपर्ब... तिरुपतीसाठी रेल्वेचं पॅकेज! प्रवास, दर्शन, थ्री स्टार हॉटेल, कन्फर्म! ओक्केच की!!
भारतीय रेल्वे
Image Credit source: social media
Follow us on

नांदेड : तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) रेल्वे प्रवास सोयीचा आहे पण दर्शनासाठी रांगेत ताटकळणं नको वाटतंय? तर रेल्वे विभागानं (Indian Railway) भाविकांसाठी एक खास पॅकेज आणलंय. यात रेल्वेचं तिकिट आणि दर्शनाचा पासही एकदम कन्फर्म मिळेल. पॅकेजच्या तारखाही आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर मिळतील. 6 ऑक्टोबर रोजी नांदेडहून प्रवास सुरु. ९ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा नांदेडमध्ये परत. दोन दिवसात चार मंदिरांचा प्रवास, थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा. एवढंच काय तर रोडचा प्रवासही एसी वाहनातून मिळेल. रेल्वे विभागानं जारी केलेल्या या पॅकेजच्या सुविधा पुढील प्रमाणे-

  •  IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर पॅकेजचं बुकिंग करता येईल.
  •  6355 रुपयांत तिरुपती बालाजी मंदिरापर्यंत रेल्वे प्रवास आणि दर्शनाचे हे विशेष पॅकेज आहे.
  • या पॅकेज टूरमध्ये नांदेड ते तिरुपती, तिरुपती ते परत नांदेडपर्यंत रेल्वेने प्रवास. तिरुपती येथे थ्रीस्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था. यासह इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.
  • 6 ऑक्टोबर रोजी नांदेड येथून रेल्वेच्या अतिरिक्त बोगीतून भाविकांना तिरुपती येथे जात येणार आहे. तेव्हा भाविकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन किशोर यांनी केले आहे.
  • प्रवासात बालाजी दर्शनासाठीचा कन्फर्म पास. बाजूची इतर चार मंदिरंही दाखवली जातील. तिथला रोड प्रवासही एसी वाहनाने केला जाईल.
  • ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांसाठी पॅकेजचे दर सारखे राहतील, अशी माहिती IRCTCचे उप महाप्रबंधक जी.पी.किशोर यांनी दिली.