Manoj jarange patil | जिंकलो, आता आपल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा The End झाला का?

| Updated on: Jan 27, 2024 | 11:38 AM

Manoj jarange patil | महाराष्ट्रभर दौरे केले. मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी प्रचंड जनजागृती केली. प्रत्येक भागात त्यांच जोरदार स्वागत झालं. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मराठे रात्रभर थांबून रहायचे. रात्री उशिरा, पहाटे त्यांची गावा-गावात भाषण झाली.

Manoj jarange patil | जिंकलो, आता आपल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा The End झाला का?
Manoj jarange
Follow us on

Manoj jarange patil | मराठा आरक्षण आंदोलनाचा विजय झालाय. मागच्या चार-पाच महिन्यांपासून यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष सुरु होता. त्यांनी दोनवेळा आमरण उपोषण केलं. महाराष्ट्रभर दौरे केले. मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी प्रचंड जनजागृती केली. प्रत्येक भागात त्यांच जोरदार स्वागत झालं. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मराठे रात्रभर थांबून रहायचे. रात्री उशिरा, पहाटे त्यांची गावा-गावात भाषण झाली. आज मराठा तरुण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार आहेत. कुठल्याही नेत्यापेक्षा सर्वसामान्य घरातून आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या एका शब्दावर बरच काही घडू शकतं. मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्यांच्या मनातील नायक बनले आहेत. अत्यंत साध राहणीमान असलेल्या या माणसाने महाराष्ट्राच राजकारण हलवून टाकलं. सर्वपक्षीय नेत्यांनी अंतरवली सराटीला भेट दिली.

आज या सर्वसामान्यांच्या मनातील जननायकाने मराठा समाजाला मोठ यश मिळवून दिलय. बऱ्याच वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढत होता, संघर्ष करत होता. न्यायालयीन लढाई देखील लढला. पण अपेक्षित मागण्या पूर्ण होत नव्हत्या. न्यायालयात आरक्षण टिकत नव्हत. पण आज मराठ्यांना मनासारख टिकणार आरक्षण मिळालय असं दिसतय. आता महाराष्ट्र सरकारसमोर कोर्टात हे आरक्षण टिकवून ठेवण्याच आव्हान आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: सांगितलय की, सरकारकडून आरक्षणाचा जीआर स्वीकारताना त्यातल्या प्रत्येक शब्द न शब्द तपासलाय. आमच्या वकिलांनी प्रत्येक शब्दाचा किस पाडलाय. त्यामुळे शेतीजा सात-बारा असतो, तसं हे आरक्षण आहे.

याचाच अर्थ असा की…..

आता अनेकांच्या मनात प्रश्न असा आहे की, हे आरक्षण आंदोलन आता संपलं का? मनोज जरांगे पाटील यांना या बद्दल विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, “मी हे आंदोलन स्थगित करतोय, याचाच अर्थ असा की, मनोज जरांगे पाटील हे गरज पडली तर आंदोलन पुन्हा सुरु करु शकतात. अध्यादेशाला काही धोका झाला, तर आझाद मैदानात मी लगेच आलो म्हणून समजा. आरक्षणात कधी अडचण झाली, तर सोडवायला मी पुढे असणार असा शब्द त्यांनी मराठा समाजाला दिलाय.