आयकर विभागाचा नागपूरकडे मोर्चा, नात्या-गोत्यातील बिल्डर्सवर धाडी

आयकर विभागाने आपला मोर्चा आता नागपूरकडे वळवला आहे. नागपुरातील बांधकाम व्यावसायीकांवर आयकर विभागाने मोठी कारवाई केली.

आयकर विभागाचा नागपूरकडे मोर्चा, नात्या-गोत्यातील बिल्डर्सवर धाडी

नागपूर : आयकर विभागाने आपला मोर्चा आता नागपूरकडे वळवला आहे. नागपुरातील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने मोठी कारवाई केली. शहरातील सहा ते सात बिल्डर्सची कार्यलयं आणि निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. करचोरीच्या संशयाने ही छापेमारी होत असल्याचं आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत आयकर विभागाची कारवाई सुरु होती, ती अजूनही सुरुच आहे. गेल्या 20 तासापासून ही छापेमारी करण्यात येत आहे.  या कारवाईत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याची माहिती आहे.  हे सर्व बिल्डर्स एकमेकांचे नातेवाईक असल्याचीही माहिती आहे. गेल्या काही दिवसांतली विदर्भातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

धाडी पडलेले बिल्डर्स – 

– महालक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

– ऑरेंज सिटी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

– अतुल युनिक सिटी

– प्रशांत बोंगीरवार

– राहुल उपगन्लावार

– अपूर्व बिल्डर्स

– पिरॅमिड रिअलिटर्स

या सर्व बिल्डर्सच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडी पडल्याची सूत्रांची माहिती आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *