AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! राजकीय धुळवडीत हा बडा नेता एकनाथ शिंदे शिवसेनेत, पक्ष प्रवेशासाठी करणार मोठे शक्तीप्रदर्शन

Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena: शिंदे शिवसेनेने राज्यात मोठी राजकीय धुळवड उ़डवून दिली. उद्धव सेनेला सातत्याने खिंडार पाडण्याचे काम शिंदे गोटातून होत आहे. आता हा बडा नेता शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! राजकीय धुळवडीत हा बडा नेता एकनाथ शिंदे शिवसेनेत, पक्ष प्रवेशासाठी करणार मोठे शक्तीप्रदर्शन
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे , शिवसेनाImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 03, 2026 | 8:37 AM
Share

किशोर पाटील/ प्रतिनिधी: शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. अनेक आमदार, विविध जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांनी तीन वर्षांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला. तर आता कोणत्याही निवडणुका नसतानाही इतर काही कारणांमुळे काही नेते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचे दिसते. माजी खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश (Unmesh Patil in Eknath Shinde Shivsena) करणार आहेत. येत्या ६ मार्च रोजी ते शक्ती प्रदर्शन करत मुंबईत शिंदे सेनेत दाखल होतील. या प्रवेश सोहळ्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

जप्तीची कारवाई आणि पक्ष सोहळा

छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडून उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई सुरू होताच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील यांनी 2024 च्या लोकसभेला भाजपकडून तिकीट नाकारल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2024 ला चाळीसगाव विधानसभा देखील लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांच्या या पक्ष सोहळ्याने चाळीसगावसह जळगावच्या राजकारणात शिंदे सेनेत गट तट तयार होतील की शिवसेना अधिक मजबूत होईल ही चर्चा होत आहे.

तीन दिवसांनी प्रवेश सोहळा

उन्मेष पाटील यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ६ मार्च रोजी मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा पक्ष प्रवेश दबावा खाली तर होत नाही ना? अशी चर्चाही होत आहे.

गेल्या महिन्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली होती. २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या पाटील यांना २०२४ मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची सक्रियता कमी झाली होती. आता त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचा फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रतिक्रियेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर मित्र पक्ष भाजप आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची काय प्रतिक्रिया असेल याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?