शिंदे गटाच्या आमदाराची पातळी सोडून राऊतांवर टीका, म्हणाले घाणीचे साम्राज्य निर्माण करणारा प्राणी…

| Updated on: Nov 29, 2022 | 10:01 PM

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना कर्नाटकातील न्यायालयाची समन्स बजावल्याची नोटीस आल्यानंतर आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता अशी शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

शिंदे गटाच्या आमदाराची पातळी सोडून राऊतांवर टीका, म्हणाले घाणीचे साम्राज्य निर्माण करणारा प्राणी...
Follow us on

जळगावः संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावरून शिंदे गटाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आजही जळगावमधील आमदार चंद्रकांत पाटील यांनी पातळी सोडून त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे संजय राऊत आणि शिंदे गटाचा वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळेच पन्नास आमदार शिवसेनेला सोडून आल्याचेही जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

त्यांच्यावर याबाबत टीका करताना ते म्हणाले की, पृथ्वीवर घाणीचे साम्राज्य करणारा जो प्राणी आहे तो प्राणी म्हणजे संजय राऊत आहे अशी जहरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना कर्नाटकातील न्यायालयाची समन्स बजावल्याची नोटीस आल्यानंतर आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता अशी शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, ते फक्त प्रसिद्धीसाठी करण्यात आले आहे. चर्चेत राहण्यासाठी ते वारंवार असं काही तरी वक्तव्य करत असतात अशी टीकाही संजय राऊत यांच्यावर करण्यात आली आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी गुवाहाटीला आमदार गेल्यानंतर आम्हाला ज्यांनी रेडा म्हणून संबोधले होते. त्यांच्या या अशा वक्तव्यामुळेच शिवसेनेतील 50 आमदार सोडून गेल्याचे सांगितले.

त्याचबरोबर त्यानी केलेल्या घाणीमुळेच हा निर्णय घेण्यात आला होता. अशी टीकाही त्यानी केली. आणि ही घाण करणारा पृथ्वीवरील जो प्राणी आहे तो प्राणी म्हणजेच संजय राऊत आहे अशी जहरी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.