
जळगाव : बोदवड तालुक्यातील (bodvad) चिखली (chikhali) येथील एका गाव खेड्यातील रिक्षाचालकाच्या मुलीने थेट नेव्ही अधिकारी (Indian Navy Officer) होण्यापर्यंत मजल मारल्याने गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे ही बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असल्यामुळे सगळीकडे मुलींचं कौतुक होतं आहे. वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील असं त्या मुलीचं नाव असून तीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठत थेट नेव्ही अधिकाऱ्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे परिसरातील लोकं भेटून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.
VAISHANVI PATIL
वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थिनीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठत थेट नेव्ही अधिकाऱ्यापर्यंत मजल मारली त्यामुळे सर्वत्र या विद्यार्थिनीचे कौतुक होत आहे. या विद्यार्थिनीचे वडील ज्ञानेश्वर पाटील हे घर सांभाळण्यासाठी रिक्षा चालवत आहेत. त्याचबरोबर वडीलांनी मुलीचं शिक्षण पुर्ण करण्यासाठी अधिक कष्ठ घेतले आहेत. त्याचबरोबर अधिकारी होण्यासाठी लागेल त्या वस्तू देखील पुरवल्या आहेत.
मुलगी अधिकारी झाल्यानंतर वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू
वैष्णवीचा हैदराबाद येथे नेव्हीची परिक्षेचा पेपर होता. त्यावेळी घरात एक रुपया सुध्दा नव्हता. शेवटी आई-वडिलांनी एलआयसी मनी बॅक पॉलिसीचे काढले. आई-वडिलांनी तात्काळ ते पैसे मुलीला विमानाच्या तिकिटासाठी देत नेव्हीच्या परीक्षेला पाठवले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत वैष्णवीने आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण केली. सध्या नेव्हीत वैष्णोवी अधिकारी झाल्यामुळे तिचं सगळीकडं कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातली किंवा शहरातील अनेक मुलं हुशार असतात, पण त्यांना घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. ज्यांना शिक्षण घ्यायचं असतं त्यांना अनेकदा अर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. वैष्णवी पाटील सुध्दा घरच्यांचा अधिक सपोर्ट असल्यामुळे इथपर्यंत मजल मारता आली. त्याचबरोबर वैष्णवी पाटील अधिक हुशार असल्यामुळे घरच्यांनी देखील तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.