“राज्यातही शिंदे-फडणवीस सरकार अतिशय वेगाने कामे करत आहे”; भाजप नेत्याची राज्य सरकारवर स्तुतिसुमनं…

| Updated on: Jan 29, 2023 | 4:27 PM

गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी मागील अडीच वर्षात लोकांनी काय भोगले, मुख्यमंत्र्यांनी कसे कामे केली हे सर्वांनी पाहिलं आहे.

राज्यातही शिंदे-फडणवीस सरकार अतिशय वेगाने कामे करत आहे; भाजप नेत्याची राज्य सरकारवर स्तुतिसुमनं...
Follow us on

जळगावः सध्या राज्यातील राजकारणामध्ये पदवीधर मतदार संघाच्या आणि पुण्याच्या निवडणुकीमुळे जोरदार हालचालींना वेग आला आहे. त्यातच पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारही जोरदार सुरु आहे. त्यातच राज्यातील राजकारणाविषयी आणि राज्य सरकारविषयी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या आगामी काळातील निवडणुकीविषयी यशाचा चढता आलेख मांडताना त्यांनी भविष्यातही भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले की, कोणता सर्व्हे काय म्हणतो याच्यापेक्षा भाजप व नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे जनता खंबीरपणे उभी आहे.

त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत चित्रपण स्पष्ट होईल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे. देशात भाजपची सत्ता असल्याने आगामी काळातही भाजप आपला करिश्मा कायम दाखवणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांच्याबरोबरच भाजपच्या नेत्यानीही यावेळी व्यक्त केला आहे.

गिरीश महाजन यांनी भाजपच्या यशाचा फार्म्यूला सांगताना त्यांनी राज्य सरकारवरही स्तुतिसुमनं उधळली आहेत. राज्यातील शिंदे गट म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार अतिशय वेगाने काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या कामाचा दाखला जनता देणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी मागील अडीच वर्षात लोकांनी काय भोगले, मुख्यमंत्र्यांनी कसे कामे केली हे सर्वांनी पाहिलं आहे.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे उत्तर उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्य सरकार मिळणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितेल.

गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका तर केलीच. मात्र त्याचवेळी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कशा पद्धतीने काम करत आहे. लोकांच्या कामांसाठी हे सरकार कसं झटत आहे हेही त्यांनी यावेळी दाखवून दिले आहे.