
वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. हगवणेंचे मामा तुरुंग विशेष महानिरीक्षक, जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावतीमधील वकिलाने त्यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. थेट कैद्याकडूनच 550 कोटींची मागणी केल्याचे म्हटले आहे. या आरोपींनी सर्वत्र खळबळ माजली आहे. आता नेमकं हे आरोप काय आहेत? चला जाणून घेऊया…
जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीमधील कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप आहे. जालिंदर सुपेकर हे 2023मध्ये अरमरावतीमध्ये तुरुंग उपमहानिरिक्षक होते. त्यावेळी त्यांनी पैसे मागितल्याचा आरोप वकिलाने केला आहे.
नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायवाड हे अमरावती तुरुंगात होते. या प्रकरणी वकील निवृत्ती कराड यांनी 4 नोव्हेंबर 2023ला नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. 550 कोटी रुपयांत निपटवून टाकतो अन्यथा अमरावती तुरुंगात मरा, अशी सुपेकरांनी धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. सहकार्य न केल्यास सुपेकरांकडून 7 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याची धमकी मिळाली होती. निलंबनाच्या कारवाईमुळे अमरावती जिल्हा करागृहात अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं..
काय आहेत मोठे 6 आरोप?
-हगवणेंना पिस्तुलाचा परवना
-कैद्यांकडे 300 कोटी मागितले
-कैदी गायकवाडांकडून जालिंदर सुपेकरांनी 550 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
– गायकवाडांचं सोनं जप्त करताना 150 कोटींचा भ्रष्टाचार
– राजू शेट्टी यांनी देखील जालिंदर यांच्यावर आरोप केला आहे. कैद्यांच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार
-वादग्रस्त मेहुणे पीआय शशिकांत चव्हाणांचं प्रमोशन