
रेल्वेच्या अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्रातील जालना ते जळगाव या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गासह देशातील सात राज्यातील 14 जिल्ह्यात एकूण आठ नव्या रेल्वे मार्गिकांसाठी एकूण 24,657 कोटी रुपयांना मंजूरी दिली आहे. या आठ मार्गिका येत्या 2030-31 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.जालना ते जळगाव या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गिकेमुळे ऐतिहासिक अंजठा येथील लेण्या आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहेत. जालना ते जळगाव हे अंतर कापण्यासाठी पूर्वी पाच तास लागायचे आता याच प्रवासासाठी तीन तास लागणार आहेत. देशातील सर्वात मोठा बोगदा जालना ते जळगाव या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गावर 23.5 किमीचा बोगदा खणण्यात येणार असून हा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे.या नव्या रेल्वे मार्गामुळे अंजठा लेण्यांना पाहायला जाणाऱ्यांना रेल्वेने जाता येणार आहे. त्यामुळे येथील पर्यटनात वाढ होणार आहे.या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गिकेसह आठ नव्या प्रकल्पांना गेल्या शुक्रवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे. ...