धक्कादायक, महिला GST ऑफिसरला लाच घेताना रंगेहात अटक

इलेक्ट्रॉनिक वस्तूचं दुकान आहे. लाचखोर महिला अधिकाऱ्याकडून इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक झाल्या प्रकरणी शो कॉज नोटीस मिळाली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता.

धक्कादायक, महिला GST ऑफिसरला लाच घेताना रंगेहात अटक
Bribe
| Updated on: Jul 29, 2026 | 9:10 AM

जालना शहरातल्या वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. एका व्यक्तीचे इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी या महिलेने केली होती. अखेर तडजोडी अंती 60 हजार रुपये घ्यायचं ठरलं. लाचेची ही रक्कम स्वीकारताना महिलेला रंगेहात पकडण्यात आलं. सुवर्णा रामेश्वर लोहिया असं या महिला अधिकाऱ्यांचे नाव आहे. तिच्यासोबत तिचा खाजगी कर सल्लागारही या जाळ्यात अडकलाय.

तक्रारदार व्यक्तीचं जालना शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तूचं दुकान आहे. तक्रारदाराला जीएसटी कार्यालय जालना येथील लाचखोर महिला अधिकाऱ्याकडून इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक झाल्या प्रकरणी शो कॉज नोटीस मिळाली होती.त्यामुळे अनलॉक करण्यासाठी खाजगी कर सल्लागारामार्फत ही लाच मागितलेली होती. त्यावेळी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.दरम्यान जीएसटी विभागातीलच महिला अधिकाऱ्याने लाच घेतल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

जालना शहरातल्या नवीन जालना परिसरात मध्यरात्री एका 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मयूर मेंढरे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून पैशांच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथकही रवाना करण्यात आलं असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे जालन्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळतंय.

परभणीत अमिष दाखवून 8 जणांची फसवणूक

बँकेत खाते उघडल्यास 1 हजार मिळतील असे अमिष दाखवून 8 जणांची फसवणूक. परभणी शहरातील घटना. आरोपीने 8जणांच्या खात्यातून 6 कोटी 97लाख 39 हजार रुपयांचा आर्थिक व्यवहार करत फसवणूक केली. तक्रारदाराला बँकेकडून सायबर फ्रॉडची नोटीस मिळाल्याने प्रकार उघड. घटनेनंतर आरोपी अविनाश आव्हाड सह इतर अज्ञात आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us