AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला वेदना होत आहेत… अजित दादांच्या विमान अपघाताच्या अहवालावर जय पवारांची पोस्ट, उपस्थित केली शंका

Jay Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यावर भाष्य करताना अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे.

मला वेदना होत आहेत... अजित दादांच्या विमान अपघाताच्या अहवालावर जय पवारांची पोस्ट, उपस्थित केली शंका
Jai PawarImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2026 | 11:11 PM
Share

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यात अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. 22 पानांच्या या अहवालातून धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते एका झाडावर कोसळले आणि त्यानंतर ते जमिनीवर आदळले असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. मात्र हा अहवाल अंतिम नाही. या अहवालावर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

मला वेदना होत आहेत…

जय पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ‘एएआयबीने दिलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला खेद वाटत असून वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांना केवळ औपचारिक माहिती नव्हे तर सत्य पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळालीच पाहिजेत.’

View this post on Instagram

A post shared by Jay Pawar (@jayajitpawar)

जय पवारांनी उपस्थित केली शंका…

जय पवार यांनी पुढे म्हटले की, ‘DGCA ने ज्या मुद्द्यांवर VSR Ventures ची काही विमाने ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाहीत. जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील. तर ते केवळ काही विमानांपूरती कारवाई न करता संपूर्ण व्हीएसआर फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण विमान ताफ्याचे संचालन बंद करण्याचाही DGCA ने विचार करावा.’

View this post on Instagram

A post shared by Jay Pawar (@jayajitpawar)

अजित दादांच्या विमान अपघाताची 3 संभाव्य कारणे

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांच्याकडून सुरू आहे. या संस्थेने आपला प्राथमिक अहवाल जारी केला आहे. यात हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान + पायाभूत सुविधा + ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याची शक्यता आहे अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच अपघाताची अंतिम कारणे CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होतील अशीही माहिती देण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...