सर्वात मोठी उलथापालथ! पवार गटाचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, NDA च्या बाजूने मत देणार!

मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. डिलिमिटेशन ही घटनात्मक प्रक्रिया असून ती करावीच लागते, असं शरद पवार यांनी यापूर्वी सांगितल्याचा दावा आव्हाड यांनी केला.

सर्वात मोठी उलथापालथ! पवार गटाचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, NDA च्या बाजूने मत देणार!
Sharad pawar ncp supports delimitation bill
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 6:16 PM

Sharad pawar ncp supports delimitation bill : सध्या देशात डिलिमिटेशन विधेयक जोरदार चर्चेत आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन विधेयकामुळे जर 50 टक्के जागा वाढणार असतील तर आपला या विधेयकाला पाठिंबा असेल, असं वक्तव्य केलं होतं. याविषयी आपण इंडिया आघाडीशीही चर्चा करु असाही दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता पक्षाचे राज्यातील दुसरे बडे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनवरुन पक्षाची भूमिका मांडली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच डिलिमिटेशन हे अनिवार्य असल्याचे सांगत डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

पवार साहेबांशी माझी या विषयावर यापूर्वीही चर्चा झाली होती. तेव्हा डिलिमिटेशनचा विषयही नव्हता. पण तेव्हा साहेबांनी मला सांगितलं होतं की, डिलिमिटेशन हे कॉन्स्टिट्यूशनल असतं आणि ते करावं लागतं. त्याला काही पर्याय नसतो. आपापले मतदारसंघ बांधायला शिका, कितीदिवस असं चालायचं. ही सगळी आमची अनौपचारिक चर्चा होती, असं यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं. पुढे आव्हाड म्हणाले की, मी ओपनली सांगतो, साहेब हे माझे दैवत आहेत. माझ्या दैवताची भूमिका जी, तिच माझी भूमिका आहे.

Loading...

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us