महायुतीच्या अडचणीत वाढ, थेट घटक पक्षाचा मोठा इशारा, नाराजी जाहीर करत..

महायुतीवर शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे नाराज आहेत. त्यांनी आता थेट आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. पहिल्यांदाच जाहीरपणे त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. एकप्रकारे त्यांनी हा मोठा इशाराच दिलाय.

महायुतीच्या अडचणीत वाढ, थेट घटक पक्षाचा मोठा इशारा, नाराजी जाहीर करत..
Jyoti Mete
| Updated on: Jul 04, 2026 | 10:04 AM

शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी नुकताच महायुती सरकारवर जोरदार निशाना साधला. ज्योती मेटे यांनी महायुती सरकारला मोठा इशारा देत म्हटले की, त्यांच्याकडून लवकरच वेगळा निर्णय घेतला जाईल. ज्योती मेटे यांनी म्हटले की, शिवसंग्रामला महायुतीत दिवंगत विनायक मेटे यांच्या हयातीत जो वाटा मिळत होता तो त्यांच्या पश्चात मिळताना दिसत नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे. आगामी निवडणुकीचा परिणाम म्हणून आगामी निवडणुकात आम्हाला पाहावे लागेल.  महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महाराष्ट्रात जिथे शक्य होईल तिथे भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत काम केले. तसे असताना शिवसंग्रामच्या वाट्याला उपेक्षा येत आहे.

त्यामुळे वेगळा विचार न करता निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवावी लागेल. वेगवेगळ्या पक्षांची भूमिका काही दिवसात पाहत आहोत तसं न करता विस्थापितांना संधी देण्यासाठी शिवसंग्राम आपलं अस्तित्व कायम राखून राजकारण करण्यावर ठाम आहे. आमच्या कार्यकर्त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी महायुतीने सन्मानजनक ठेवावे.  महायुतीला नम्र आवाहन करतो शिवसंग्रामला योग्य वाटा देण्याच्या दृष्टिकोनातून आगामी काळात पावलं उचलली गेली पाहिजेत.

अन्यथा या कार्यकर्त्याच्या मानसिकतेला थोपवणे अवघड जाईल. ही खंत मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली आहे. शिवसंग्रामने विनायक मेटे यांना गमावले मात्र ताकद गमावलेली नाही. याच ताकदीचा विचार करून महायुतीने योग्य तो सन्मान द्यावा. पक्षाची धोरणं असतील अन्य सहयोगी पक्षांसाठी त्यात शिवसंग्रामचा विचार झाला पाहिजे. -मात्र तसे घडताना दिसले नाही.

पुढे ज्योती मेटे यांनी म्हटले की, आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना आवर घालण्यास कठीण जाईल. अद्याप स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला नाही‌. बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आम्ही लढलो. मात्र, जी आश्वासन देण्यात आली त्याची पूर्तता झाली नाही. आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बीड आहे. ज्योती मेटे यांनी एकप्रकारचा अत्यंत मोठा इशाराच महायुती सरकारला दिला आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडालीये.

Follow Us