AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ आधीच, अभाविप आणि एनएसयुआयमध्ये जुंपली…

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शुल्का संदर्भात चुकीच्या गोष्टी सावित्रीच्या लेकींकडून वदवून घेतले जात आहे. खालच्या पद्धतीचे राजकारण काँग्रसेला करावे लागत आहे, असा आरोप अभाविपने केला आहे.

पुण्यात राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गुंज' आधीच, अभाविप आणि एनएसयुआयमध्ये जुंपली...
ABVP AND NSUI CLASHED
| Updated on: Aug 21, 2026 | 10:46 PM
Share

पुण्यात उद्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज कार्यक्रम होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाआधीच भाजपाची विद्यार्थी संघटना अभाविप आणि काँग्रेसचे युवक संघटन एनएसयुआय यांच्यात जुंपली आहे. अभाविप संघटनेच्या लोकांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे. तर अभाविप संघटनेने काँग्रेस विद्यार्थ्यांकडून फी संदर्भात चुकीचे वदवून घेत घाणेरडे राजकारण करत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या दौऱ्याआधी झालेल्या या गोंधळामुळे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टिवार देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यात उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ (Chhatron Ki Goonj Pune) हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी  युवकांशी संवाद साधणार आहेत. मात्र त्याआधी काँग्रेसचे एनएसयुआ आणि भाजपाचे छात्र संघटन एबीव्हीपीमध्ये येथे हमरीतुमरी झाली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हेदेखील पोहोचले आहेत.  एनएसयुआयने अभाविपच्या कार्यकर्त्यांंनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

एबीव्हीपीचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी काही तरुणांना धमकावल्याचा, तसेच राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंजच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यासाठी धमकावल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे. या गोंधळानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येथे जमल्याने दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि आरोप प्रत्योराप सुरु झाले आहेत.

दोन अनाथ मुलींना कोंडून ठेवले – विजय वडेट्टिवार

सीओईपीमधील या दोन अनाथ मुलींना कोंडून ठेवले. अभाविपच्या गुडांनी त्या अनाथ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकत त्यांना मारहाण केली. कार्यक्रम उद्धवस्थ करण्यासाठी हे षडयंत्र रचले गेल्याचा आरोप यावेळी विजय वडेट्टिवार यांनी केला आहे.

सीओईपीमधील ज्या विद्यार्थीनीने फीच्या विरोधात तक्रार केली होती. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तिने फी संदर्भात आपले आरोप चुकीचे असून ते आपल्याकडून वदवून घेतल्याचे सांगत कॉलेज प्रशासनाची माफी मागत आहे असा या विद्यार्थींनीचा व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आला आहे.

दरम्यान, सीओईपी सारख्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान विद्यापीठातील शुल्का संदर्भात चुकीच्या गोष्टी सावित्रीच्या लेकींकडून वदवून घेतल्या जात आहेत. खालच्या पद्धतीचे राजकारण काँग्रसेला करावे लागत आहे, काँग्रेसच्या राहुल गांधींना ही छात्रों की गुंज ऐकू येत नाही का असा आरोप अभाविपने केला आहे. कोटा, डेहराडून आणि प्रयागराज नंतर आता पुण्यात राहुल गांधी ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी येणार आहेत.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?