दिल्लीत मोठं काही घडणार? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांचा मास्टरप्लॅन… राहुल गांधी यांची…
INDIA Bloc Protest Against Election Commission: कथित मत चोरीचा मुद्दा आणि EVM मधील गडबडीचा मुद्दा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी उपस्थित केला होता. महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकचे उदाहरण देत त्यांनी निवडणूक आयोगावर आरोपांची राळ उडवून दिली होती.

INDIA Bloc prolonged agitation Against CEC Gyanesh Kumar: देशातील 19 विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या झेंड्या खाली दिल्ली दणाणून सोडली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांनी ही लढाई आकाशवाणी भवनात चालूच ठेवली. काँग्रेसचे अनेक खासदार यावेळी उपस्थित होते. राहुल गांदी यांनी परवाच काँग्रेस महासचिव आणि प्रदेशाध्यक्षांना आंदोलन दीर्घकाळ चालेल याची सूचना दिली होती. मंगळवारी संसदेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आकाशवाणी भवनातून देशाचे राजकारण कूस बदलेल असा दावा करण्यात येत आहे. आता सरकारविरोधात INDIA आघाडी काय भूमिका जाहीर करते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इंडिया आघाडी आंदोलनाचे लोण गावागावात नेणार?
INDIA आघाडीची एक आठवड्यापूर्वीच बैठक झाली होती. त्यात मतदार याद्यांमधील गडबड ऐरणीवर होती. याविरोधात दीर्घ आंदोलनाचा निर्णय झाला. सोमवारी काँग्रेसने आंदोलनाचे लोण गावागावात पोहचवण्याचे निश्चित केले. SIR प्रक्रियेत ज्यांची नावं कापल्या गेली. त्यांची नावं पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी एक महिन्याच्या दीर्घ आंदोलनाची आणि मोहिमेची घोषणा करण्यात आली. संसदेपासून ते निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत इंडिया आघाडीने सरकारविरोधात राग आळवला आहे.
लोकतंत्र के गद्दारो को बचाने के लिए बचे-खुचे लोकतंत्र को घसीटा गया है।
हिसाब होगा – एक भी देशद्रोही बख्शा नहीं जाएगा। https://t.co/QbngN1p9y6
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 6, 2026
राहुल गांधीकडून एक वर्षांपासून विरोध
राहुल गांधी यांनी गेल्यावर्षी 7 ऑगस्ट रोजी ईव्हीएम गडबड आणि मतदार याद्यांमधील घोळाविरोधात पहिल्यांदा मुद्दा उठवला होता. पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला होता. त्यानंतर विरोधकांनीही इतर राज्यात हा मुद्दा उपस्थित केला. महाविकास आघाडीसह ठाकरे बंधूंनी आयोगावर चाल केली. पत्रकार परिषदेत घेत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला होता. पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतदार वगळण्यात आले. तर इतर राज्यातही हाच प्रकार वाढल्याने भाजपविरोधात विरोधक आता एकजूट झाले आहेत. SIR प्रक्रियेवर मोठी शंका उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी देशात वणवा पेटवला आहे.तर तीन दिवसांनी दिल्लीत CJP चे आंदोलन होणार आहे. सध्या आप आणि डावे पक्ष जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात दिल्लीत मोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
