AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयशी पंगा महागात! बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काकुळतीला, कोट्यवधींचं नुकसान आणि लीग बंद करण्याची वेळ

बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि पहिल्याच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची पुरती वाट लागली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारताशी घेतला पंगा महागात पडला आहे.

बीसीसीआयशी पंगा महागात! बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काकुळतीला, कोट्यवधींचं नुकसान आणि लीग बंद करण्याची वेळ
बीसीसीआयशी पंगा महागात! बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काकुळतीला, कोट्यवधींचं नुकसान आणि लीग बंद करण्याची वेळImage Credit source: Bangladesh Cricket Twitter
| Updated on: Aug 21, 2026 | 10:02 PM
Share

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला भिकेचे डोहाळे लागले आहेत. बीसीसीआयशी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यान घेतलेली आडमुठी भूमिका आता अंगाशी येताना दिसत आहे. भारतासोबत टी20 मालिका आयोजित करण्यासाठी सुरू असलेली धडपड पुन्हा एकदा फेल गेली आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेशात अशी टिमकी बांगलादेश क्रिकेट बोर्ड वाजवत होता. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण अफगाणिस्तानने भारतासोबत टी20 मालिकेचं वेळापत्रक सप्टेंबरमध्ये जाहीर केलं आणि बांगलादेशची पुन्हा नाचक्की झाली. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबाल यांनी पु्न्हा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू केलं आहे. तमीम यांनी सांगितलं की, भारतासोबत मालिकेसंदर्भात चर्चा सुरू आहे आणि तारीख बदलली जाऊ शकते.

भारत बांगलादेश मालिका अजूनही पूर्णपण रद्द झालेली नाही, असंही इकबाल म्हणाले. बांगलादेशमध्ये 28 ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या देशांतर्गत ‘गेम डेव्हलपमेंट ट्रॉफी’ या स्पर्धांमुळे भारताच्या दौऱ्यावर परिणाम होणार नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं. ही स्पर्धा मीरपूरमध्ये होणार आहे. पण गरज पडली तर ढाक्यातील बशुंधरा ग्राउंडवर स्थलांतरीत करू, असंही त्यांनी सांगितलं. भारतासोबतची मालिका ठरल्यानंतर देशांतर्गत सामन्यांचं वेळापत्रक आखलं जाईल. दरम्यान, भारताचा बांग्लादेश हा दौरा यापूर्वी 2025 मध्ये होणार होता. पण राजकीय अस्थिरतेमुळे भारताने जाणं टाळलं. त्यानंतर सप्टेंबर 2026 साठी पुढे ढकलण्यात आला होता. पण तिथेही भारत अफगाणिस्तान मालिका ठरल्याने गणित फिस्कटलं.

दरम्यान, बीसीसीआयच्या सांगण्यावरून कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने बांगलादेशी अष्टपैलू मुस्तफिझुर रहमाला संघातून काढलं होतं. या निर्णयानंतर, अमीनुल इस्लाम यांच्या नेतृत्वाखालील बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारत श्रीलंका येथे होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बराच वाद रंगला होता. त्यानंतर बांगलादेशच्या जागी स्कॉटलँड संघाला संधी मिळाली होती. आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. तमीम यांच्या हाती सूत्र आल्यापासून बीसीसीआयसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे यंदा बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धा रद्द होण्याची शक्यता बळावली आहे. बीसीबी अध्यक्ष तमीम इकबाल यांनी सांगितलं की, मागच्या दोन पर्वात बांग्लादेश प्रीमियर लीगमुळे 40 कोटी बांग्लादेशी टका (म्हणजेच 31 कोटी) रूपयांचं नुकसान झालं आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा