AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Toxic Advance Booking : रिलीजआधीच ‘टॉक्सिक’चा धुमाकूळ; 6 तासांत विकली हजारो तिकीटं; बॉक्स ऑफीसचे सगळे रेकॉर्ड्स मोडणार ?

Toxic Advance Booking Report : यश याच्या 'टॉक्सिक' या आगामी चित्रपटाची सगळीकडेच चर्चा असून दमदार ॲडव्हान्स बुकिंगलाही सुरूवात झाली आहे. चित्रपटासाठी मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे.

Toxic Advance Booking : रिलीजआधीच ‘टॉक्सिक’चा धुमाकूळ; 6 तासांत विकली हजारो तिकीटं; बॉक्स ऑफीसचे सगळे रेकॉर्ड्स मोडणार ?
Toxic movie
| Updated on: Aug 21, 2026 | 9:52 PM
Share

Toxic Advance Booking Report : अभिनेता यश आणि कियारा अडवाणी यांचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पुढल्या आठवड्यात म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून मोठ्या पडद्यावर चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच म्हणजेच आजपासून ( 21 ऑगस्ट शुक्रवार) चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. मात्र बूकिंग सुरू होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर मोठा इतिहास रचला आहे. ही सुरूवात पाहता चित्रपट मोठी, बंपर कमाई करेल यात काहीच शंका नाही.

 अवघ्या 6 तासांत 30 हजार तिकिटांची विक्री

यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या 6 तासांत पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीन प्रमुख नॅशनल चेनमध्ये तब्बल 30 हजार तिकिटांची विक्री झाली. या सुरुवातीच्या तूफान प्रतिसादावरून ‘टॉक्सिक’ पहिल्याच दिवशी हिंदी भाषेतून 45 ते 50 कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशभरात 84 हजारांहून अधिक तिकिटांची बुकिंग

नॅशनल चेनसोबतच नॉन-नॅशनल चेनमधील बुकिंगचा आकडाही पाहिला, तर ‘टॉक्सिक’ चित्रपटाची क्रेझ आणखी स्पष्ट दिसून येते. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत देशभरात ‘टॉक्सिक’ची तब्बल 84,315 तिकिटं बुक झाली होती. पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच बूकिंग सुरू झालं असून या बुकिंगमधून चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 4.1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ब्लॉक सीट्सचा समावेश केल्यास हा आकडा 9.19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ॲडव्हान्स बुकिंगला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

सहा भाषांमध्ये रिलीज होणार ‘टॉक्सिक’

गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टॉक्सिक’मध्ये यश मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत कियारा आडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा, तारा सुतारिया, आणि रुक्मिणी वसंत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी अशा एकूण सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तब्बल 4 वर्षांनंतर या चित्रपटातून यश मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 2022 साली आलेल्या KGF 2 नंतर त्याचा कोणताही मोठा चित्रपट आलेला नाही. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटासाठी अतिशय उत्सुक आहेत. आता प्रेक्षकांकडून या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत