AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : महाध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! सिंहस्थ कुंभमेळ्याला होणार आज सुरुवात

| Updated on: Oct 31, 2026 | 9:12 AM
Share

Maharashtra News LIVE : आज नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठी 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.

Maharashtra News LIVE : महाध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! सिंहस्थ कुंभमेळ्याला होणार आज सुरुवात
Big BreakingImage Credit source: tv9 Marathi

LIVE NEWS & UPDATES

  • 31 Oct 2026 09:12 AM (IST)

    ७० ते ८० जणांचे प्राण वाचवणाऱ्या आर्याच्या शौर्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

    पिंपरी-चिंचवडमधील भीषण सोसायटी आग प्रकरणात ७० ते ८० रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या २० वर्षीय आर्या कांबळेच्या धाडसाची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे.मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून आर्याचे विशेष कौतुक करत अभिनंदन केलंय.मध्यरात्री लागलेल्या आगीच्या संकटात आर्याने गॅलरीतून उडी मारली. यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली, मात्र स्वतःच्या वेदना बाजूला ठेवत तिने सोसायटीतील रहिवाशांना जागं करून सुरक्षित स्थळी जाण्यास मदत केली. या आगीत १७ दुचाकी आणि ४ चारचाकी जळून खाक झाल्या; मात्र आर्याच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. तिच्या शौर्याचा महाराष्ट्राला अभिमान असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

  • 31 Oct 2026 09:05 AM (IST)

    AI डेटा सेंटरसह चार प्रकल्पाविरोधात आज रास्तारोको आंदोलन

    सोलापूरच्या उजनी धरणावरील AIडेटा सेंटरसह एकूण 4 प्रकल्पावरून राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उजनी धरणावरील AI डेटा सेंटरसह चार प्रकल्पाविरोधात आज रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी SP गटाचे आमदार रोहित पवार हे आंदोलनात सहभागी असणार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून उजनीवरील 4 प्रकल्पाच्या समर्थनार्थ आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. उजनी धरणावर 1 लाख 65 हजार कोटींचे एकूण 4 प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये Ai डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर पॅनल, लघु अणुऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

  • 31 Oct 2026 08:57 AM (IST)

    हत्तीला पिटाळन्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अंगावर फेकले बॉम्ब

    टस्कर हत्तीला पिटाळन्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीच्या अंगावर सुतळी बॉम्ब फेकल्याचे समोर आले आहे. चंदगड तालुक्यातील मोटणवाडी येथे हा प्रकार घडला. गेल्या दोन दिवसापासून अण्णा नावाच्या सर्वात मोठ्या टस्कर हत्तीचा वावर होता. हत्तीला परत जंगलात पाठवण्यासाठी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीचा वापर करण्यात आला.

  • 31 Oct 2026 08:55 AM (IST)

    लोणावळा रेल्वे स्थानकात राडा, तिकीट तपासणीसाला प्रवाशाकडून बेदम मारहाण

    लोणावळा रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीदरम्यान टीसी आणि प्रवाशामध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झालं. संतप्त प्रवाशाने टीसीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेमुळे रेल्वे स्थानकात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 31 Oct 2026 08:50 AM (IST)

    बहुप्रतीक्षित रुग्णालयाचे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्घाटन

    नांदेडमधील बहुप्रतीक्षित रुग्णालयाचे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्घाटन करण्यात आले आहे. पावडेवाडी येथील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते कापली रिबीन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते रुग्णालयाचे उदघाटन. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना झालं होतं रुग्णालय मंजूर.

  • 31 Oct 2026 08:40 AM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाचे तीन हल्ले

    चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या एका आठवड्यात तीन जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असतानाच आज वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ले केले असून या मधे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

  • 31 Oct 2026 08:36 AM (IST)

    उत्तर मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन

    भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह उत्तर मुंबईतील सर्व आमदार आणि मंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम सहभागी होणार आहेत.

  • 31 Oct 2026 08:35 AM (IST)

    ठाकरेंच्या अडचणीत वाढ, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

    वाशिम जिल्ह्यातील वनोजा इथं रस्ता रोको केल्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसतानाही मोठ्या संख्येने एकत्र येऊन मंगरूळपीर -अकोला महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी गुन्हे दाखल.

  • 31 Oct 2026 08:34 AM (IST)

    वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल

    वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, पोक्सो कलम तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक प्रारंभ होणार आहे. शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अर्दे राज्य मंत्रिमंडळ, व्हीआयपी आणि विविध आखाड्याच्या साधु-संतांची मांदियाळी होणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागांत काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईसह विविध ठिकाणी अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. काही भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या काही भागांतील नागरिक आणि शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

कॉकरोच जनता पार्टी जूनमध्ये नीट पेपर लीक प्रकरणी दिल्लीत आंदोलन करत होती. त्या वेळी पंजाबी गायक दिलजीत दोसांज यांना सीजेपीच्या प्रोटेस्टबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा दिलजीत म्हणाला होता की, मला या सगळ्यापासून दूरच ठेवा, मी एक कलाकार आहे, राजकारणी नाही. दिलजीतच्या या कमेंटवर अभिजीत दीपके यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता दिल्लीत झालेल्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने आपल्या ‘मी कलाकार आहे’ या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर दिलजीतसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

Published On - Oct 31,2026 8:32 AM

Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट