AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आज ध्वजारोहण, रोहित पवारांचा सरकारला तिखट प्रश्न

Rohit Pawar Public Notice on Kumbha Mela: आज नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं महाध्वजारोहण होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होत असतानाच आमदार रोहित पवार यांनी जाहीर नोटीस देत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Rohit Pawar: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आज ध्वजारोहण, रोहित पवारांचा सरकारला तिखट प्रश्न
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आज ध्वजारोहण, रोहित पवारांचा सरकारला तिखट प्रश्न
| Updated on: Oct 31, 2026 | 9:21 AM
Share

Rohit Pawar on Simhastha Kumbh Mela 2026: नाशिकमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळ्याचं महाध्वजारोहण दुपारी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्म, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अर्धेधिक मंत्रिमंडळ नाशकात असेल. त्याचवेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कुंभ मेळ्यातील अनियमिततेवर बोट ठेवत अधिकाऱ्यांना एक जाहीर नोटीस दिली आहे. त्यांनी सरकारला तिखट सवाल केला आहे. त्यावरून आता एकच खळबळ उडाली आहे.

रोहित पवार यांचे गंभीर आरोप

रोहित पवार यांच्या जाहीर नोटीसमध्ये अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध शासकीय कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. प्रशासकीय, प्रक्रियात्मक, तांत्रिक आणि पर्यावरणा संदर्भातील नियम धाब्यावर बसवल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी वृत्तपत्रात याविषयीची जाहीर नोटीस दिली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या पवित्र आणि मोठ्या धार्मिक महोत्सवाच्या नावाखाली शासकीय यंत्रणा आर्थिक अनियमितता करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अनेकदा तक्रारी तरीही दखल नाही

आमदार रोहित पवार यांची राज्य सरकारला आणि कुंभ अधिकाऱ्यांना वृत्तपत्राद्वारे जाहीर नोटिस दिली आहे. नाशिकमधील सिहस्थ कुंभमेळ्यातील अनेक कामा मधे अनियमितता झाल्या आहेत या अनियमितेच्या संदर्भात वारंवार अनेक तक्रारी सुधा आल्या होत्या पण सरकारकडून आणि अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला. कुंभमेळ्यासाठी काम करणारे अनेक प्राधिकरण या प्रश्नाच्या संदर्भात उत्तरदायी असल्याचे ते म्हणाले.

रोहित पवार यांचे जाहीर नोटीसद्वारे गंभीर आरोप

आमदार रोहित पवार यांनी या जाहीर नोटीसद्वारे कुंभ मेळ्यातील विविध कामातील अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.

निविदा प्रक्रियेत फेरफार: निविदा अटींमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मर्जीतील कंत्राटदारांना काम देण्यात आले. फायद्यासाठी नियमात बदल करण्यात आला. स्पर्धात्मक बोली प्रक्रियेला डावलण्यात आले.

डिजिटल गैरव्यवहारांचा आरोप: CCTV, AI या आधारित सुरक्षा यंत्रणा आणि इतर प्रणालींसी संबंधित कंत्राटावर त्यांनी आक्षेप नोंदवला. याविषयीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा त्यांचा आरोप आहे.

पायाभूत सुविधांबाबत आक्षेप: रस्ते बांधकाम, पादचारी सुविधा, भूमिगत गटार आणि इतर स्थळांच्या उभारणीसाठी मोठा विलंब झाला. या कामावर देखरेख झाली नाही आणि योग्य अंमलबजावणी करण्यात आली नाही असा आरोप केला.

पर्यावरणाला ठेंगा: पूर्वपरवानगीशिवाय वृक्षतोड, गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांचे प्रदूषण, औद्योगिक सांडपाण्याचा विसर्ग आणि पर्यावरणाविषयीच्या कायद्यांचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप रोहित पवार यांनी या जाहीर नोटीसद्वारे केला आहे.

शासकीय निधीचा अपहार: रोहित पवार यांनी एकूणच कुंभमेळ्यातील कामावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा अनावश्यक सुधारीत अंदाजपत्रके सादर करण्यात आली. नाहक फेरबदल आदेश देण्यात आले. शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट