AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP : कॉकरोच जनता पार्टीची मोठी राजकीय चाल, सौरभ दासकडून दिवाळी पार्टीचं आयोजन, या खासदारांना बोलावलं

CJP : कॉकरोच जनता पार्टीने एक मोठी राजकीय चाल खेळली आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी एक पार्टी आयोजित केली आहे. सौरभ दास या पार्टीचे यजमान आहेत. देशाच्या राजकारणात सध्या कॉकरोचेसची भरपूर चर्चा आहे.

CJP : कॉकरोच जनता पार्टीची मोठी राजकीय चाल, सौरभ दासकडून दिवाळी पार्टीचं आयोजन, या खासदारांना बोलावलं
CJP
| Updated on: Oct 31, 2026 | 9:19 AM
Share

सध्या देशाच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे काही नेते आणि कॉकरोच जनता पार्टीमध्ये जवळीक वाढत चालली आहे. CJP नेता सौरभ दासने शनिवारी दिवाळी पार्टी आयोजित केली आहे. या पार्टीला तृणमुल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन आणि माकपचे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांच्यासह विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. CJP नेतृत्व आणि विरोधी पक्षाचा एक वर्ग यांच्यातील पहिली भेट म्हणून याकडे पाहिलं जात आहे. CJP चे सहसंयोजक आणि प्रवक्ता सौरभ दास या कार्यक्रमाचे यजमान आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि सह संयोजक आशुतोष रांका या कार्यक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या दोघांकडून अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्या शिवाय आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह आणि पक्षाचे अन्य नेते सुद्धा या दिवाळी समारंभाच्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात.

डाव्या आघाडीच्या एक वरिष्ठ नेत्याने म्हटलं की, “आमच्या पक्षाच्या काही नेत्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे. विद्यमान राजकीय परिस्थितीबद्दल गंभीर चर्चा होऊ शकते” विरोधी पक्षाचा एक वर्ग आणि सीजेपीमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांची मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोध प्रदर्शनं सुरु होती. तेव्हापासून ही जवळीक वाढण्यास सुरुवात झाली.सीजेपी नेत्यांच्या अटकेचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. त्यानंतर सीजेपीने सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या 1 नोव्हेंबरच्या रॅलीचं समर्थन केलं.

जवळीक वाढायला कधी सुरुवात झाली?

सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेवर राहुल गांधी यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिलेली. “जंतर-मंतरवर शांततापूर्ण प्रदर्शनादरम्यान तिरंगा फडकवणं काही गुन्हा नाहीय. त्यासाठी युवकांना तुरुंगात टाकणं हा डरपोकपणा आहे” असं राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलेलं. राहुल गांधी यांनी आपल्या अन्य एका संदेशात विद्यार्थी, युवा वर्ग, पत्रकार आणि इंडिया आघाडीचा उल्लेख केलेला. “बॅनर वेगवेगळे असले तरी उद्देश एक आहे. सर्व प्रदर्शनं नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांच्या मागणीशी निगडित आहेत.जंतर-मंतर भारताच्या नागरिकांचं आहे ते पुन्हा परत मिळवून राहणार” असं राहुल गांधी म्हणालेले.

या घडामोडी यासाठी महत्वाच्या

राहुल गांधींच्या या प्रतिक्रियेवर सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी सार्वजनिकरित्या त्यांचे आभार मानले होते. अटकेत असलेल्या नेत्यांच्या समर्थनासाठी काँग्रेस नेत्यांचं कौतुक केलं होतं. या घडामोडी यासाठी महत्वाच्या आहेत, कारण मध्यंतरी दोन्ही पक्षांमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा होती. अभिजीत दीपके यांनी रामलीला मैदानावर होणाऱ्या विरोधी पक्षाच्या रॅलीचं समर्थन केलं आहे. कॉकरोच जनता पार्टी 1 नोव्हेंबरला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या रॅलीचं समर्थन करते. राष्ट्र प्रथम आहे.

Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट