AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss फेम अभिनेत्रीला एक्स बॉयफ्रेंडकडून मारहाण, थेट रक्ताने सिंदूर भरायला निघालेला, जीवे मारण्याची धमकी अन्…

बिग बॉस फेम स्पर्धक कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल 'बिग बॉस'च्या घरात सांगत असतात. आता देखील एका अभिनेत्रीने तिच्या भयानक रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला. तो तिला मारहाण करायचा आणि रक्ताने सिंदूर भरायला निघालेला... जाणून घ्या अभिनेत्री काय म्हणाली...

Bigg Boss फेम अभिनेत्रीला एक्स बॉयफ्रेंडकडून मारहाण, थेट रक्ताने सिंदूर भरायला निघालेला, जीवे मारण्याची धमकी अन्...
Kanika Mann
| Updated on: Oct 31, 2026 | 9:14 AM
Share

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ मधील स्पर्धक आता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. माही वीज हिने काही दिवसांपूर्वी घटस्फोट आणि पोटगीवर मोठं वक्तव्य केलं होतं. आता स्पर्धक कनिका मान हिने देखील तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. कनिका अशा एका रिलेशनशिपमध्ये होती, ज्यामध्ये तिच्या एक्स – बॉयफ्रेंडने तिला मानसिक छळ केलेला. कॉलेजमध्ये असताना पहिल्या वर्षात कनिका हिच्या रिलेशनशिपची सुरुवात झालेली. त्या रिलेशनशिपबद्द कनिका हिने इतर स्पर्धकांना सांगितलं. त्या रिलेशनशिपमध्ये कनिका हिला आलेला अनुभव फार भयानक होता.

कनिकाने तिच्या नात्याची सुरुवात सांगताना म्हटलं की, कॉलेजच्या पहिल्याच वर्षात तिला तिचा पहिला बॉयफ्रेंड मिळालेला. तिने सांगितलं की, इतर मुलींना उशिरापर्यंत त्यांच्या बॉयफ्रेंडशी बोलताना पाहून तिलाही तसेच करावेसं वाटलं, ज्यामुळे तिने फेसबुक अकाउंट बनवलं. ती त्या मुलाला कशी भेटली हे सांगताना ती म्हणाली, ‘मी फेसबुक चालवलं आणि त्यावर अकाउंट बनवलं. जो पहिला मुलगा मला थोडासाही भाव देऊ लागला, तोच माझा बॉयफ्रेंड बनला.’ मात्र, नंतर तिने त्याला एक ‘सायको’ (psycho) म्हटलं.

जेव्हा कनिकाला एक्स बॉयफ्रेंडने मारली कानशिलात…

कनिकाने एक्स – बॉयफ्रेंडच्या हिंसक वागणुकीवर देखील मोठं वक्तव्य केलं. त्याने कनिका हिला सर्वांसमोर कानशिलात लगावलेली. यावर कनिका म्हणाली, ‘तो कधीही माझ्या क्लासरुममध्ये यायचा. एकदा तर त्याने मला कानशिलात लगावली होती, कारण मी सिंगल स्ट्रॅप असलेला ड्रेस घातलेला.’, तिने हेदेखील सांगितले की, त्या वेळी तिने नुकतीच पियर्सिंग करून घेतली होती आणि या घटनेनंतर तिथून रक्त वाहू लागलं होतं. कनिका हिचं अपमानकारक रिलेशनशिप…

एक्स – बॉयफ्रेंडने कनिका हिला मारहाण देखील केलेली, पण कोणीत तिचा बचाव करण्यासाठी पुढे आलं नाही. कनिका असं देखील म्हणाली की, जर त्याच्यासोबत कुठे जाण्यास नकार दिल्यानंतर एक्स – बॉयफ्रेंड तिला वडिलांना फोन करण्याची धमकी द्यायचा. एकदा तर त्याने कनिकाच्या वडिलांना फोन देखील केलेला. पण त्यांनी फोन उचलला नाही.

पुढे कनिका म्हणाली, ‘जर वडिलांनी तेव्हा फोन उचलला असता तर, माझी त्या रिलेशनशिपमधून लवकर सुटका झाली असती.’ कनिका असं देखील म्हणाली, ‘आठ – नऊ महिला वकिलीचा अभ्यास केल्यानंतर काही कायदेशीर गोष्टी मला कळू लागलेल्या, त्याच आधारावर मी त्या भयानक नात्याचा शेवट केला.’ कनिकाने सांगितलं की, तिचा एक्स बॉयफ्रेंड हॉस्टेलपासून तिच्या डिपार्टमेंटपर्यंत तिचा पाठलाग करत आला होता. इमारतीत प्रवेश करताना घडलेल्या घटनेबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘मी आत जात असताना त्याने माझा हात पकडून ओढले. थंडीचे दिवस होते, त्याने हुडी घातली होती आणि त्याच्याकडे चाकू होता. त्याने चाकू काढला आणि स्वतःच्याच हातावर खोल वार केले – साधारण 3-4 वेळा.’

तिने पुढे सांगितले, ‘त्याने माझे केस पकडले होते आणि म्हणाला की तो सिंदूर भरेल.’ तिने सांगितलं की, तिने ताबडतोब एका व्यक्तीला पोलिसांना बोलावण्यास सांगितलं. त्या व्यक्तीने पोलिसांना फोन केला, ज्यामुळे तिचा एक्स बॉयफ्रेंड घाबरला. त्यानंतर त्याला दोन-तीन दिवस तुरुंगात काढावे लागले. मात्र, त्याच्या घरच्यांनी तिला धमकावणं सुरूच ठेवलं. तिने सांगितलं की, ती या छळाबद्दल आपल्या कुटुंबाला सांगायला घाबरत होती, परंतु या कठीण काळात साथ दिल्याबद्दल तिने कुटुंबाचे आभार मानले.

Follow Us
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू