AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडच्या मुलाच्या अडचणीत वाढ, थेट मुलावरच…. Walmik karad Son

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. घरास घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडच्या मुलाच्या अडचणीत वाढ, थेट मुलावरच.... Walmik karad Son
walmik karad newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 9:17 AM
Share

सोलापुरातून वाल्मिक कराडच्या मुलाचं धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, पोक्सो कलम, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 14 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुलावर गुन्हा झाल्याने तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचं टेन्शन आणखी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडची दादागिरी देखील समोर येऊ लागल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्याविरोधात गंभीर गुन्ह्याचा आरोप होता. मॅनेजरच्या घरात घुसून त्याला आणि मुलीला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप होता. त्यानंतर आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहराच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा संपूर्ण प्रकार आहे.

सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर या तिघांवर हा गुन्हा दाखल केला आहे. सुशील कराड आणि त्याच्या साथीदाराने पीडित महिला आणि तिच्या पतीसह मुलीला घरात घुसून धमकी देत मारहाण केल्याचा आरोप आहे.  तसेच त्यांच्या नावावरील प्लॉट, सोने धमकी देऊन स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय पीडितेच्या दोन 6 वाहने देखील स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आलेय. हा सर्व प्रकार 2024 साली घडला होता. पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलाय. दोन वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर सुशील कराडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर सोलापूर पोलिसांनी पुढाकार घेऊन सुशील कराडच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. यामुळे वाल्मिक कराडसह सुशील कराडच्या अडचणीत वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट