AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्योगपती हर्ष गोयंका यांच्याकडून तोंडभरून कौतुक, तुकाराम मुंडे म्हणाले , ‘मी तर….’

IAS Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासनाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाची चर्चा आता सात समुद्रापार पोहचली आहे. त्यांच्या प्रामाणिक कामाचे तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे. त्यात उद्योगपतीही मागे नाहीत. या सर्व घडामोडींवर तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रियाही व्हायरल झाली आहे.

उद्योगपती हर्ष गोयंका यांच्याकडून तोंडभरून कौतुक, तुकाराम मुंडे म्हणाले , 'मी तर....'
उद्योगपती हर्ष गोयंका यांच्याकडून तोंडभरून कौतुक, तुकाराम मुंढे म्हणाले , 'मी तर....'
| Updated on: Oct 31, 2026 | 8:35 AM
Share

IAS Tukaram Mundhe : आपल्या धडाकेबाज कारवाया, प्रमाणिकपणा आणि सडेतोडपणासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे ओळखले जातात. अन्न आणि औषध प्रशासनाची(FDA) सूत्रं हाती आल्यापासून त्यांचं नाव देशातच नाही तर परदेशातही गाजत आहे. त्यांच्यावर सर्वसामान्य जनताच नाही तर उद्योगपतीही फिदा आहेत. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर त्यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. या पोस्टला मुंढे यांनी सुद्धा उत्तर दिले. त्या उत्तराने नेटकऱ्यांचं मन जिंकलं.

हर्ष गोयंका यांच्याकडून तोंडभरून कौतुक

प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी समाज माध्यम एक्सवर तुकाराम मुंढे यांचे तोंडभरून कौतुक केले. देशाला अशा अधिकाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर प्रत्येक नागरिकाला अशा कर्तव्यकठोर अधिकाऱ्याला भेटण्याची उत्सुकता असते. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांकडून ज्या अपेक्षा असतात, तेच काम ते प्रत्यक्षात करतात. अन्नातील भेसळ, अस्वच्छ हॉटेल्स आणि बड्या आस्थापनांवर धडक कारवाई करत ते जनतेचे रक्षण करत आहेत, असे कोडकौतुक गोयंका यांनी केले. याविषयीची पोस्ट त्यांनी एक्सवर केली आणि त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेक नेटकऱ्यांनी आणि दिग्गजांनी मुंढे यांच्या प्रामाणिक कामाचे जोरदार कौतुक केले.

तुकाराम मुंढे यांच्य नम्रतेने जिंकली मने

तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष आणि तत्वनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात. इतक्या मोठ्या पदावर असतानाही त्यांचा तोल ढळत नाही. ते तितकेच नम्र सुद्धा आहेत. त्यांनी हर्ष गोयंका यांच्या या कौतुकाला नम्रतेने उत्तर दिले. लोकसेवा ही कोणत्याही व्यक्तीभोवती केंद्रित नसते. ती नागरीकांच्या सेवेसाठी असलेली एक सामूहिक बांधिलकीची भावना आहे. देशात अनेक चांगले सनदी अधिकारी अत्यंत प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करत आहेत. कदाचित माझ्यापेक्षाही ते उत्तम काम करत असतील. पण त्यांच्या या प्रयत्नांना हवी तशी ओळख मिळत नाही. मी तर या मोठ्या उद्दिष्टासाठी एकत्र काम करणाऱ्या टीमचा एक छोटासा भाग आहे. जे काही साध्य करत आहोत, ते एका सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे मुंढे यांनी नमूद केले. मुंढे यांच्या या नम्र उत्तरावरही नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. त्यांनी देशातील इतरही प्रामाणिक सनदी अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावले.

Follow Us
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त