Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील विकासकामांचे ऑडिट करण्याची मागणी केली होती. या मागणीला अनुमोदन दिल्यानंतर त्यांच्या प्रभागातील विकास निधी शून्य करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, हा […]
पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील विकासकामांचे ऑडिट करण्याची मागणी केली होती.
या मागणीला अनुमोदन दिल्यानंतर त्यांच्या प्रभागातील विकास निधी शून्य करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, हा निधी राजकीय सूडनितीने गोठवण्यात आला आहे. अमोल बालवडकर यांनी “भाजप राम दाखवते, पण त्यांच्या वागणुकीत रावण आहे,” अशी टीका केली. या प्रकारानंतर संतप्त नगरसेवकांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. दुसरीकडे, भाजपनेही बालवडकरांच्या अहंकारी वर्तणुकीबद्दल सुनेत्रा पवारांकडे तक्रार केल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेतील निधीवाटपावरून सुरू झालेला हा वाद आता मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्रालयापर्यंत नेण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिला आहे.
Published on: Aug 21, 2026 08:32 PM
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..

