मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ही महत्त्वाची निवड १७ ऑगस्ट रोजी संसदीय कार्य मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची त्यांना महत्वपूर्ण संधी मिळाली आहे. या नियुक्तीपत्र स्वीकारण्याचा सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
ज्येष्ठ कार्यकर्त्या ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही महत्त्वाची निवड १७ ऑगस्ट रोजी संसदीय कार्य मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची त्यांना महत्वपूर्ण संधी मिळाली आहे. या नियुक्तीपत्र स्वीकारण्याचा सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ज्योती वाघमारे यांनी आपले नियुक्तीपत्र स्वीकारले. महिला आणि बालकांच्या विकासासाठी समर्पित असलेल्या या मंत्रालयाच्या सल्लागार समितीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या समितीमार्फत महिला आणि बालकांशी संबंधित विविध धोरणे आणि कार्यक्रमांवर विचारविनिमय करून त्यांना योग्य दिशा दिली जाते. ज्योती वाघमारे यांच्या निवडीमुळे महिला आणि बालकांच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय स्तरावर या संवेदनशील विषयांवर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर होईल.
Published on: Aug 21, 2026 05:08 PM
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?

