AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत अफगाणिस्तान टी20 मालिकेबाबत संभ्रम! बीसीसीआय आणि एसीबीमध्ये चर्चेचं कारण काय?

भारत अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्याचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. मात्र या वेळपत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआय आणि एसीबीमध्ये चर्चा सुरू आहे.

भारत अफगाणिस्तान टी20 मालिकेबाबत संभ्रम! बीसीसीआय आणि एसीबीमध्ये चर्चेचं कारण काय?
भारत अफगाणिस्तान टी20 मालिकेबाबत संभ्रम! बीसीसीआय आणि एसीबीमध्ये चर्चेचं कारण काय?Image Credit source: PTI
| Updated on: Aug 21, 2026 | 6:03 PM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिके होणार हे गेल्या काही दिवसात स्पष्ट झालं होतं. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतचं वेळापत्रकही जाहीर केलं होतं.अफगाणिस्तानचा संघ पुढच्या महिन्यात भारतात येणार आहे. अफगाणिस्तानकडे या मालिकेचं यजमानपद असून ही मालिका भारतात होणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात खेळले जाणार आहेत. पण या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात चर्चा सुरू आहे. त्यामुळे नेमका काय बदल होणार याबाबत उत्सुकता आहे. रिपोर्टनुसार, तारखा पाठीपुढे केल्या जाण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड या तारखांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे.

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी एक सामना खेळण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. गणेश चतुर्थी 14 सप्टेंबरला आहे. आता जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारत अफगाणिस्तान पहिला सामना 13 सप्टेंबरला आहे. दुसरा 15 सप्टेंबर आणि तिसरा 17 सप्टेंबरला आहे. पण आता पहिला सामना 11 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. दुसरा सामना 13 सप्टेंबर आणि तिसरा सामना 14 सप्टेंबरला आयोजित करण्यासाठी धडपड सुरू आहे. आता बीसीसीआय अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी मान्य करणार की नाही? असा प्रश्न आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ भारतात आला होता. तेव्हा एक कसोटी सामना आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळला होता. टी20 मालिका खेळायची बाकी होती.

श्रीलंका मालिकेनंतर टीम इंडियाला आाराम!

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कसोटी मालिका 27 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आरामा करणार आहे. अफगाणिस्तान मालिकेपूर्वी काहीच नाही. त्यामुळे ही मालिका लवकर सुरू झालं तर क्रीडाप्रेमींना मेजवानी मिळणार आहे. त्यात 24 सप्टेंबरपासून आशियाई गेम्स सुरू होणार आहेत. तिथपर्यंत ही मालिका संपून जाईल. दुसरीकडे, गणेश चतुर्थी म्हणजेच 14 सप्टेंबरला सामना ठेवला तर लोकं जास्त संख्येने हा सामना पाहतील. सुट्टीचा दिवस असल्याने क्रीडाप्रेमींना या सामन्याचा आनंद लुटता येईल. त्यामुळे बीसीसीआय अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी मान्य करू शकते.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ