
प्रशासकीय दीरंगाईला कंटाळून केज तहसिलकार्यालयाच्या समोर एका कुटुंबातील चारजणांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जमीनीच्या मोजणीला महसूल अधिकाऱ्यांनी नकार देत खोडा घातल्याचा आरोप करीत संतापलेल्या लांडगे कुटुंबियाने हे टोकाचा पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावध असलेल्या पोलिसांना वेळीच पाऊल उचलल्याने पुढील अनर्थ टळला. नेमका काय प्रकार पाहूयात
केज – बीड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वडीलोपार्जित गायरान जमीनीतील क्षेत्रावर लांडगे कुटुंबाची वहिवाट आहे. मात्र, या जमिनीचा ताबा मिळवण्यात त्यांना कायदेशीर अडचणी येत आहेत. केज न्यायालयाने या जमीनीची मोजणी करुन त्याचे सीमांकन करण्याचा आदेश दिलेला होता. या आदेशाबरहुकूम तहसीलदारांनी १२ जानेवारीला भूमि अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचारी, मंडळाचे अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी हे जमीनीवर प्रत्यक्ष हजर राहून मोजणी करणार होते.
केज मोजणी कर्मचारी घटनास्थळी पोहचले, मात्र मंडळ अधिकाऱ्याने मोजणी प्रक्रियेत सहकार्य केले नाही आणि अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेले लांडगे कुटुंब संयम सुटला. महसुल विभागाच्या दुर्लक्षामुळे लांडगे कुटुंबाने थेट तहसील कार्यालयाच्या चार सदस्यांनी थेट तहसील कार्यालय गाठले. लांडगे कुटुंबातील सदस्यांनी अंगावर डिझेल ओतले आणि स्वत:ला आग लावल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि कर्मचाऱ्याने वेळीच त्यांना रोखल्याने अनर्थ टळला.
केज येथील विष्णू श्रीमंत लांडगे आणि त्यांच्या पाच भावडांना सर्व्हे क्र. ३०/१ आणि ३०/२ मधील प्रत्येकी ३२.४४ आर जमीन मा. दिवाणी न्यायालय (क- स्तर), केज येथील दिवाणी दावा क्र. ७५/२०२४ मधील अंतिम हुकूमनाम्यानुसार वाटप झाली आहे. या न्यायालयीन आदेशानुसार मिळालेल्या जमिनीची नोंद महसूल अभिलेखात घेण्यात आली. वाटप तक्ता तयार करण्यासाठी जमिनीची मोजणी करण्याचे आदेश तहसील कार्यालयाने दि. १३ मार्च २०२५ रोजी केज येथील भूमि अभिलेख कार्यालयाला दिले होते.