AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाला जबर धक्का, थेट महापौरपद जाणार? कल्याण डोंबिवलीमध्ये जबर धक्का; आकडे फिरल्याने खळबळ!

राज्यात 29 महापालिका निवडणुकींचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत मुंबई महापालिकेत भाजपा-शिंदे यांच्या युतीने बाजी मारली आहे. कल्याण डोंबिवलीत मात्र भापजाला चांगलाच धक्का बसला आहे.

भाजपाला जबर धक्का, थेट महापौरपद जाणार? कल्याण डोंबिवलीमध्ये जबर धक्का; आकडे फिरल्याने खळबळ!
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 9:03 PM
Share

Kalyan Dombivli Election Result : राज्यात एकूण 29 महापालिका निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत बहुसंख्य जागांवर भाजपाने बाजी मारली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत कोण विजयी होणार तसेच कोणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. येथे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची महायुती यांचा महापौर बसणार आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड अशा महत्त्वाच्या पालिकांमध्येही भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. सुरुवातीला भाजपा 90 पेक्षा जास्त जागांवर विजयी होऊ शकतो, असे सांगितले जात होते. परंतु रात्री आकडे फिरले आणि भाजपाला एकहाती बहुमत गाठता आले नाही. तसेच काँग्रेसच्या जागा मात्र चांगल्याच वाढल्या. दरम्यान, असाच काहीसा प्रकार कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. इथे अचानकपणे आकडे फिरले असून भाजपाचे टेन्शन वाढले आहे. या महापालिकेच्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत नेमकं काय झालं?

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक निकालात अगोदर भाजपाने जोरदार मुसंडी मारली होती. या ठिकाणी भाजपाचा एकहाती विजय होतो की काय, अशी स्थिती होती. विशेष म्हणजे या महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची चांगली ताकद आहे. परंतु निकालाच्या सुरुवातीला शिंदे यांच्या पक्षाचं टेन्शन वाढलं होतं. परंतु निकालाचा कल रात्री चांगलाच बदलला आणि भाजपाच्या जागा धाडकण खाली आल्या.

सध्याचा नेमका निकाल काय?

सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एकूण 52 जागा मिळाल्या आहेत. ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा 10 जागांवर विजय झाला आहे. काँग्रेसचा दोन तर मनसेचा 5 जागांवर विजय झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाला एका जागेवर बाजी मारता आली आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र 122 पैकी 48 जागांवर विजयी पताका फडकावला आहे. कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन करायची असेल तर एका पक्षाला 61 हा जादुई आकडा पार करावा लागतो. परंतु या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे अगोदर जास्त जागा निवडून येण्याची शक्यात असलेल्या भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत तर शिंदे यांच्या शिवसेनेने मुसंडी मारली आहे. त्यामुळे इथे महापौर कोणाचा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...