AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती उभी होती, तो आला फोन खेचला अन्… 14 वर्षीय मुलीसोबत रेल्वे यार्डात भयंकर घडलं, महाराष्ट्र पुन्हा हादरला

Kalyan Crime News : कल्याण रेल्वे यार्डात धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ सोनवणे नावाच्या आरोपीने एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

ती उभी होती, तो आला फोन खेचला अन्... 14 वर्षीय मुलीसोबत रेल्वे यार्डात भयंकर घडलं, महाराष्ट्र पुन्हा हादरला
Kalyan Crime NewsImage Credit source: Google
| Updated on: May 17, 2026 | 4:06 PM
Share

मयुरेश जाधव, प्रतिनिधी:  गेल्या काही काळापासून राज्यात महिलांवरील अत्याच्याच्या घटना खूप वाढलेल्या आहेत. खासकरून अल्पवयीन मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. पुण्यातील नसरापूरमध्ये एक चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना आता कल्याण रेल्वे यार्डात धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ सोनवणे नावाच्या आरोपीने एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेनंतर आता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संतापजनक घटना

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे यार्डात तरुणाने एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी नराधम सौरभ सोनवणे या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे स्टेशन सारख्या गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ही घटना नेमकी कशी घडली ते जाणून घेऊयात.

आरोपीने मुलीचा मोबाईल हिसकावला अन्…

सदर पीडित 14 वर्षांची मुलगी आपल्या मामाला भेटण्यासाठी अहिल्यानगर येथून बसने कल्याणला आली तेथून तिला खोपोलीला जायचे असल्याने ती कल्याण रेल्वे स्टेशनवर आली व ट्रेन ची वाट बघत होती. याच दरम्यान आरोपी सौरभ सोनवणे याची नजर तिच्यावर पडली. एकटी असल्याची संधी साधक सौरभने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला जबरदस्तीने तिचा मोबाईल हिसकावून घेतला. मुलीने जेव्हा मोबाईल परत मागितला तेव्हा सौरभने त्याला मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल असे धमकावले.

रेल्वे यार्डात नेत लैंगिक अत्याचार

घाबरलेली ही पिढीत मुलगी सौरभ सोबत निघाली मात्र सौरभने तिला पोलीस स्टेशनला न नेता कल्याण रेल्वे यार्डात नेले व त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कशीबशी सुटका करत पीडित तरुणीने थेट कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठले. घडल्या प्रकाराबाबत तिने तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासत सौरभ सोनवणे याला बेड्या ठोकल्या आहेत. आता पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?