Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पावरून वाद पेटला; जंगलातील वृक्षतोडीविरोधात कर्जतकरांची बंदची हाक

टोरंट जलविद्युत प्रकल्पावरून वाद पेटला आहे. जंगलातील वृक्षतोडीविरोधात कर्जतकरांनी आज बंदची हाक दिली आहे.

Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पावरून वाद पेटला; जंगलातील वृक्षतोडीविरोधात कर्जतकरांची बंदची हाक
torrent project
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 7:43 AM

रायगडमधील कर्जत तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या टोरंट जलविद्युत प्रकल्पावरून अधिकच वातावरण तापलं आहे. टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोडीवरून कर्जतकरांनी आज सोमवारी तालुका बंदची हाक दिली आहे. कर्जतमधील जंगलतोडीविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. साईडोंगर जंगल वाचवण्यासाठी आज एकवटणार आहेत.  भीमाशंकर, साईडोंगर परिसरातील जंगलतोडीविरोधात कर्जतकरांचा एल्गार पुकारला आहे. जंगल वाचवा, निसर्ग वाचवा’चा नारा देत आज सोमवारी कर्जत तालुका बंदची हाक दिली आहे.

टोरंट जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विरोध दर्शवला आहे. टोरंट जलविद्युत प्रकल्पाला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे देवराम लांडे यांनी स्पष्ट केले आहेत. पंतप्रधानांनी हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारावा, असा सल्ला देवराम लांडे यांनी दिला. या प्रकल्पाच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभा देखील घेतली. तर विविध राजकीय पक्षांनी कर्जतमधील आंदोलकांची भेट घेतली.

Loading...

वृक्षतोडीचा आठवले गटाकडूनही निषेध 

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरेंट प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा विरोध आता सत्ताधारी पक्ष देखील करताना दिसत आहे. पाली, कोथळ खलाटी येथील साई डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरणप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांकडून या वृक्षतोडीला विरोध केला जात आहे. सत्ताधारी आरपीआयचा आठवले गट देखील या आंदोलनात उतरला आहे. आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देत वृक्षतोडीची पाहणी केली. यावेळी पक्षाच्या वतीने वृक्षतोडीचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला.कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरेंट प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याची चिंता विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.याच पार्श्वभूमीवर आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह साई डोंगर परिसराला भेट देत वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी पक्षाच्या वतीने वृक्षतोडीचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध नोंदवण्यात आला. साई डोंगरावरील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर विविध राजकीय पक्ष आणि पर्यावरणप्रेमी एकत्र येत विरोध दर्शवत असल्याने, आता या प्रकरणात प्रशासन आणि संबंधित प्रकल्प व्यवस्थापन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us