स्तुत्य ! कुष्ठरोग्यांच्या भल्यासाठी केडीएमसी आयुक्तांचं एक पाऊल पुढे, कुष्ठरोगी महिलांना रोजगार देणार

| Updated on: Jan 30, 2021 | 3:27 PM

केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आज कल्याणमधील कुष्ठरोग वसाहतीला भेट दिली (KDMC Commissioner will give employ to leprosy women).

स्तुत्य ! कुष्ठरोग्यांच्या भल्यासाठी केडीएमसी आयुक्तांचं एक पाऊल पुढे, कुष्ठरोगी महिलांना रोजगार देणार
Follow us on

कल्याण (ठाणे) : देशात आज जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिवस साजरा केला जातोय. या दिनानिमित्त वेगवेगळ्या संस्था कुष्ठरोग रुग्णालयांना किंवा वसाहतींना भेट देतात. केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी देखील आज कल्याणमधील कुष्ठरोग वसाहतीला भेट दिली. आजही समाजामध्ये कुष्ठरोग्यांना हवी तशी चांगली वागणूक मिळत नाही. त्यांना वसाहतीत चांगली वागणूक मिळतेय की नाही, याची शाहनिशा त्यांनी केली. याशिवाय त्यांनी वसाहतीची परिस्थिती आणि आरोग्य यंत्रणोच्या कामाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान कुष्ठरोगी महिलांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं (KDMC Commissioner will give employ to leprosy women).

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत हनुमाननगर कुष्ठरोग वसाहत आहे. कुष्ठरोग दिनानिमित्त आज केडीएमसी आयुक्त सूर्यवंशी यांनी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील, कुष्ठरोग्यासाठी काम करणारे गजानन माने, माजी नगरसेवक कैलास शिंदे, माजी नगरसेविका रेखा चौधरी यांच्या उपस्थितीत कुष्ठरोग वसाहतीची पाहणी केली (KDMC Commissioner will give employ to leprosy women).

केडीएमसीत 16 नवे कुष्ठरुग्ण आढळून आहेत. त्यातील चार हे विकृत आहे. ही गंभीर बाब असल्याने हा पाहणी दौरा महत्वाचा होता. रुग्णांची परिस्थिती काय आहे, वसाहतीची स्थिती काय आहे ? हे जाणून घ्यायचं होतं. कुष्ठरोग रुग्णालय एप्रिल अखेरपर्यंत तयार होणार आहे. यावेळी आयुक्तांनी औषधं किती आहेत याची स्थिती जाणून घेतली. महिलांसाठी शिवण मशीन दिली जाणार आहेत. या द्वारे कुष्ठरोग्यांसाठी रोजगार उपलब्ध देण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन केडीएमसी आयुक्तांनी यावेळी दिले.

हेही वाचा : Special Story | संयमी स्वभाव आणि धडाकेबाज कामगिरी, मराठमोळ्या अधिकाऱ्याची कर्तबगार कहाणी