Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांचा दावा खरा, फक्त सिया आणि चेतन नाही तर तिसरा व्यक्तीही… मोठा ट्विस्ट..

केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. दोन आरोपींनी पोलिसांनी अटक केली. केतन अग्रवालच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केली आहेत. यादरम्यानच आता पोलिस तपासात धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांचा दावा खरा, फक्त सिया आणि चेतन नाही तर तिसरा व्यक्तीही... मोठा ट्विस्ट..
Ketan Agarwal Murder Case
| Updated on: Jun 25, 2026 | 7:54 AM

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. यादरम्यानच आता पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती मिळाली आहे. संपूर्ण हत्याकांडाला यामुळे एक वेगळे वळण आले. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी अगोदरच पोलिस कोठडीत आहेत. सर्व तपास या दोघांपुढेच फिरताना दिसला. आता यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली. ज्यामुळे सिया चेतन आणि अजून काही लोक यात सहभागी असल्याचा शक्यता वर्तवली जात आहे. प्रियकर चेतन हा पोलिस चाैकशीदरम्यान दिशाभूल करत आहे. चेतन आणि सिया यांनी केतनचा काटा काढण्याचा प्लॅन शांत डोक्याने रचला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 18 जून रोजी चेतन चाैधरी याने स्वत:चा मोबाईल मुद्द्याम त्यांच्या घरीच ठेवला होता. तो मार्केटयार्डमधून लोहगड किल्ल्यावर आला, त्यावेळी त्याच्याकडे मोबाईल फोन होता पण स्वत:चा नाही.

आपले लोकेशन लोहगड किल्ल्यावर दिसू नये, याकरिता त्याने थेट आपला मोबाईल घरीच ठेवला होता. केतन अग्रवाल याच्या हत्येदरम्यान तो सियाच्या संपर्कात होता, पण त्याच्या नाही तर दुसऱ्याच मोबाईलच्या माध्यमातून. चेतन याने लोहगडावर जाताना आपला कामगार असलेला नीरज कुमार याचा मोबाईल फोन आपल्यासोबत ठेवला होता. धक्कादायक बाब म्हणजे केतन याला 400 फूट दरीत ढकलण्यापूर्वी आणि त्याच्या अगोदरही तो याच नंबरच्या माध्यमातून सिया हिच्या संपर्कात होता.

सतत दोघांमध्ये बोलणे होत होते. तांत्रिक तपास आणि कॉल रेकॉर्ड डेटा पोलिसांनी तपासला असता हा संपूर्ण कट उघडकीस आला. पोलिसांनी नीरज कुमार याचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला. नीरजचा मोबाईल फोन हा मोठा तांत्रिक पुरावा पोलिसांकरिता आहे. पोलिसांनी नीरज कुमार याला ताब्यात घेतले. या हत्याकांडात नीरज कुमार याचाही सहभाग आहे की, त्याला न कळत चेतनने त्याचा मोबाईल घेतला, याबाबत तपास सुरू आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, केतन याचा खून करायचे सर्वकाही सिया आणि चेतन यांचे नियोजित होते. हेच नाही तर केतन अग्रवाल याच्या वडिलांनी अगोदरच आरोप केला की, या हत्याकांडात फक्त सिया आणि चेतन हेच नसतील असूनही काही लोकांचा समावेश असून शकतो. सियाच्या कुटुंबियांवरही केतनच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. केतनच्या हत्येला सिया, तिचे आई वडील आणि आत्या जबाबदारी असल्याने केतन अग्रवालच्या कुटुंबियांनी म्हटले.

Follow Us