AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची चर्चाही नाही, कुठे उल्लेखही नाही तो ठरला वरचढ, शुभमन,अभिषेक पाहतच राहिले, काय घडलं?

पंजाब क्रिकेट असोसिएशनने नुकतीच आपली नवीन लीग, शेरे-ए-पंजाब टी20 लीग जाहीर केली. लीगसाठीचा पहिला लिलाव प्रभावी ठरला, ज्यात खेळाडूंना तीव्र बोली लागली. पंजाबमधून सध्या भारतीय संघात अनेक खेळाडू खेळत आहे. यामुळे या खेळाडूंवर विशेष लक्ष होते की कोणाला सर्वाधिक बोली लागते. पण भारतीय संघात खेळणाऱ्या एकही खेळाडूवर मोठी बोली लागलेली नाही. 

ज्याची चर्चाही नाही, कुठे उल्लेखही नाही तो ठरला वरचढ, शुभमन,अभिषेक पाहतच राहिले, काय घडलं?
| Updated on: Aug 10, 2026 | 10:01 AM
Share

पंजाब क्रिकेट असोसिएशनने नुकतीच आपली नवीन लीग, शेरे-ए-पंजाब टी20 लीग जाहीर केली. लीगसाठीचा पहिला लिलाव प्रभावी ठरला, ज्यात खेळाडूंना तीव्र बोली लागली. पंजाबमधून सध्या भारतीय संघात अनेक खेळाडू खेळत आहे. यामुळे या खेळाडूंवर विशेष लक्ष होते की कोणाला सर्वाधिक बोली लागते. पण भारतीय संघात खेळणाऱ्या एकही खेळाडूवर मोठी बोली लागलेली नाही.  भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला सर्वाधिक बोली लागलेली नाही. गिलला डावलून अष्टपैलू खेळाडू संवीर सिंग सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला संघात घेण्यासाठी फाजिल्का फाल्कन्सने ₹13.20 लाखांची सर्वाधिक बोली लावली. विशेष म्हणजे, संवीर सिंगला लीगच्या कोणत्याही मार्की खेळाडूंपेक्षा जास्त पैसे मिळाले.

फाजिल्का फाल्कन्सने भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला आपला मार्की खेळाडू म्हणून संघात सामील केले आहे. लीगच्या नियमांनुसार, सर्व मार्की खेळाडूंना ₹10 लाखांच्या निश्चित रकमेच्या करारात समाविष्ट केले जाते. परिणामी, लिलावात खरेदी केलेल्या संवीर सिंगला शुभमन गिलपेक्षा जास्त पैसे मिळाले. आता संवीर आणि शुभमन दोघेही एकाच फ्रँचायझीसाठी खेळताना दिसतील.

29 वर्षीय संवीर सिंग हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचाही भाग राहिला आहे. संवीरने आतापर्यंत 46 टी20 सामन्यांमध्ये 32.94 च्या सरासरीने आणि 180.06 च्या धडाकेबाज स्ट्राइक रेटने 560 धावा केल्या आहेत. त्याने 13 बळीही घेतले आहेत. त्याने 25 प्रथम-श्रेणी आणि 41 लिस्ट ए सामनेही खेळले आहेत. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे लिलावात त्याला संघात घेण्यासाठी संघांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली.

या लीगमध्ये शुभमन गिल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग, रमणदीप सिंग आणि गुरनूर ब्रार यांच्यासह पंजाबचे अनेक प्रमुख खेळाडू मार्की खेळाडू म्हणून दिसतील. सर्व मार्की खेळाडूंना प्रत्येकी 10 लाख रुपये शुल्कावर संघांसोबत करारबद्ध करण्यात आले आहे. संवीर सिंग व्यतिरिक्त, नमन धीर, अमोलप्रीत सिंग, हरनूर सिंग आणि अश्वनी कुमार यांसारख्या खेळाडूंनीही लिलावात वर्चस्व गाजवले.

नमन धीरला अमृतसर सुरमाजने 10.80 लाख रुपयांना विकत घेतले. अमोलप्रीत सिंग देखील 8.20 लाख रुपयांना मोहाली किंग्स संघात सामील झाला. हरनूर सिंग आणि अश्वनी कुमार यांना बठिंडा रॉयल्सने प्रत्येकी 7 लाख रुपयांना संघात घेतले. सुखदीप बाजवाला जालंधर वॉरियर्सने 6 लाख रुपयांना विकत घेतले. हरप्रीत ब्रारला 4 लाख रुपयांना मोहाली किंग्स संघात सामील करण्यात आले.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप