Sarfaraz Khan Post: भारतीय संघात कमबॅक होताच सर्फराज खानची खोचक पोस्ट, Photo शेअर करत म्हणाला…
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने सराव सामना खेळला होता. आता या मालिकेपूर्वीच भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतींचा सामना करताना पाहायला मिळाले. आता या खेळाडूंची रिप्लेसमेंटही बीसीसीआयने जाहीर केली आहे. साई सुदर्शन हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. आता साईची रिप्लेसमेंट म्हणून सर्फराज खानचे नाव बीसीसीआयने घोषित केले आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने सराव सामना खेळला होता. आता या मालिकेपूर्वीच भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतींचा सामना करताना पाहायला मिळाले. आता या खेळाडूंची रिप्लेसमेंटही बीसीसीआयने जाहीर केली आहे. साई सुदर्शन हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. आता साईची रिप्लेसमेंट म्हणून सर्फराज खानचे नाव बीसीसीआयने घोषित केले आहे. आता सर्फराज खान श्रीलंका दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात परतला आहे. दुखापतीमुळे बाहेर झालेल्या साई सुदर्शनची जागा त्याने घेतली आहे. दरम्यान, भारतीय संघात परतल्यानंतर सर्फराज खान उत्साही दिसला आणि त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
सर्फराजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतीय संघाची ट्रॅव्हलिंग जर्सी घातलेले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये त्याचे वडीलही त्याच्यासोबत दिसत आहेत. सरफराजने सनग्लासेस घातले आहेत, जे त्याचा रुबाब स्पष्टपणे दर्शवते. मात्र, त्याने आपल्या पोस्टला कॅप्शन दिले नाही, फक्त इमोजी शेअर केले. त्याने या पोस्टवर जर्सी या चित्रपटातील एक गाणं लावले आहे. Aarambhame Le हे गाणं त्याने या पोस्टला लावले असून त्याचा अर्थ असा होता की ही तर “फक्त सुरुवात आहे”
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करणारा सरफराज खान भारतासाठी शेवटचा 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. सरफराज खानने भारतीय संघासाठी एकूण सहा कसोटी सामने खेळले असून 372 धावा केल्या आहेत. सर्फराजची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या 2024-25 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीही भारतीय संघात निवड झाली होती, परंतु तो एकही सामना खेळला नाही. सर्फराज इंग्लंड दौऱ्यावर भारत ‘अ’ संघाचाही भाग होता, परंतु जून-जुलै 202t मध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याला मुख्य भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
या अडचणी असूनही, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आणि राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याच्या शर्यतीत तो कायम राहिला. भारत ‘अ’ संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान साई सुदर्शनच्या अंगठ्याला दुखापत झाली. तो सध्या बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) मध्ये उपचार घेत आहे. सुदर्शनच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने म्हटले आहे की, तो लवकर बरा होत असून वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
श्रीलंकेविरुद्ध अद्ययावत भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिकल, सारांश जैन, आकिब नबी, सर्फराज खान.
