खालपूरमध्ये लेडीज बारवर छापा, पोलिसांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात

रायगड :  खालापूरमधील लेडीज बारवर पोलिसांनी केलेली छापेमारी संशयास्पद आहे. पोलीस अधीक्षकांनी धाड टाकल्याची कबुली दिली आहे, मात्र खालापूर पोलीस त्याला नकार देत आहेत. त्यामुळे नेमकं खरं काय असा प्रश्न असून, पोलिसांवरच संशय आहे. खालापूर पोलिसांनी 5 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास  मुंबई-पुणे जुन्या हाय वेलगत शेजारी-शेजारी असणाऱ्या स्वागत आणि पूनम बारवर छापेमारी केली. यावेळी …

खालपूरमध्ये लेडीज बारवर छापा, पोलिसांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात

रायगड :  खालापूरमधील लेडीज बारवर पोलिसांनी केलेली छापेमारी संशयास्पद आहे. पोलीस अधीक्षकांनी धाड टाकल्याची कबुली दिली आहे, मात्र खालापूर पोलीस त्याला नकार देत आहेत. त्यामुळे नेमकं खरं काय असा प्रश्न असून, पोलिसांवरच संशय आहे.

खालापूर पोलिसांनी 5 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास  मुंबई-पुणे जुन्या हाय वेलगत शेजारी-शेजारी असणाऱ्या स्वागत आणि पूनम बारवर छापेमारी केली. यावेळी दोन पोलीस जीप आणि व्हॅन त्याठिकणी आल्या होत्या. त्याची माहिती मिळताच काही पत्रकार वृतांकनासाठी घटनास्थळी दाखल झाले.

नेमकी घटना काय आहे याची माहिती घेण्यासाठी पत्रकार रात्री 10 नंतर खालापूर स्टेशनला पोहोचले. त्यावेळी जी वाहने धाडसत्रासाठी वापरण्यात आली होती, तीच वाहने पोलीस स्टेशनबाहेर उभी असल्याने पत्रकारांना कारवाईची खात्री झाली. पण पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना धाडसत्राच्या कारवाईची माहिती विचारली असता, पोलिसांनी याबाबत कानावर हात ठेवले. अशी कोणतीच कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस माहिती लपवत असल्याचं पत्रकारांच्या लक्षात आलं. यासंदर्भात टीव्ही 9 ने जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुजांळ यांना मोबाईलवर मेसेज पाठवून याबाबतची माहिती विचारली. त्यावेळी अनिल पारसकर यांनी रिप्लाय देत धाडसत्र झाल्याची कबुली दिली. मात्र काहीही संशयास्पद आणि बेकायदेशीर न आढळल्याने पोलीस परत आले अशी पुष्टी जोडली.

अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली, मात्र दुसरीकडे खालापूर पोलीस असे काही घडलेच नसल्याचा आव आणत होते.  याबाबत आणखी सत्यता जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 ची टीम घटनास्थळी पोहोचली आणि स्वागत आणि पूनम बारच्या मध्यभागी असलेल्या दुकानदारांना याबाबतची माहिती विचारली. त्यावेळी त्या दुकानदारानेही धाडसत्र झाल्याचं सांगितलं.

त्यामुळे खालापूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खालापूर पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे खालापूर पोलिसांनी नेमके कोणत्या हेतूने दोन्ही बारवर धाडसत्र राबविले हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *