अजितदादा आमच्यासोबत आहेत, म्हणून शरद पवारांसमोर…; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis on Ajit Pawar Sharad Pawar and Kolhapur Lokasbha Election 2024 : देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं नाव घेत शरद पवारांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? यंदाच्या लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

अजितदादा आमच्यासोबत आहेत, म्हणून शरद पवारांसमोर...; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 7:50 PM

कोल्हापूरच्या चंदगडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. लोकांनी देशांमध्ये नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याचे मन बनवले आहे. संजय मंडलिक यांना खासदार बनवण्याचे नागरिकांनी ठरवले आहे. देशासमोरचे नाही तर त्यांच्या पक्षासमोरचे नरेंद्र मोदी हे संकट आहेत. अजितदादा आमच्यासोबत आहेत. त्यामुळे नक्कीच शरद पवार यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांचे संकट आहे. जनता याचे उत्तर मतपेटीतून देईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी जोरदार टोला लगावला आहे.

“तो तर राजेंचा अवमान”

राजकारणात पक्ष वेगवेगळे असू शकतात. मात्र अडचणीच्या काळात आजारपणाच्या काळात विचारपूस करणे मदत करणं, ही आपली संस्कृती आहे. नरेंद्र मोदी हे नेहमी पाळतात. नरेंद्र मोदी हे त्या काळात नियमितपणे उद्धव ठाकरे यांची फोन करून विचारपूस करत होते. संभाजीराजे यांचा राज्यसभेच्या निवडणुकी वेळी अवमान केला. संभाजीराजे यांना अटी आणि नियम घालून लिहून घेणे हे चुकीचं आहे. एकीकडे छत्रपती घराण्याचा सन्मान दाखवायचा आणि दुसरीकडे असे लिहून घेणे हे चुकीचं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

इंडिया आघाडीवर टीकास्त्र

26 पक्षाचे खिचडीमध्ये नेता कोण? 5 वर्ष्यात 5 पंतप्रधान बनवणार. चुकून याच्या हातात खुडची दिली तर संगीत खुर्ची सारखे सुरू होईल. घंटा वाजली की हा पंतप्रधान… देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे आहेत. 10 वर्ष्यात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर आले. कारण मोदी यांनी भ्रष्टाचार बंद केला. 20 कोटी लोकांना झोपडीतून बाहेर आणलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक

नरेंद्र मोदींनी देशातला भ्रष्टाचार बंद केला. मोदीजींनी दहा वर्षांमध्ये वीस कोटी लोकांना झोपडीमधून पक्क्या घरात आणले. पाच वर्षात पाच कोटी घरांमध्ये चुली ऐवजी गॅस दिला.पुढील पाच वर्षात नरेंद्र मोदी 80 कोटी लोकांना मोफत रेशन धान्य देतील.महिला पायावर उभा करण्याचं काम मोदी करत आहेत. माजातील प्रत्येक घटक साठी मोदी यांनी काम केले आहे. विशेषतः हा शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. विरोधक म्हणतात मोदी यांना ऊसाबद्दल काय कळतंय? पण शेतकऱ्याच्या ऊसाबद्दल अनेक निर्णय मोदी यांनी घेतले आहेत. इथेनॉल निर्णय घेतल्यामुळं कारखानदारी टिकून राहिली, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.