AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat : वंदे भारत एक्स्प्रेसच्या खाली आली गाय, चालकाने काय केले पाहा Video

vande bharat accident: व्हायरल व्हिडिओत ट्रेनच्या खाली फसलेली गाय दिसत आहे. शेजारी एक मालगाडी उभी असल्याचे दिसत आहे. अनेक जण या घटनेचा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस थोडी पुढे गेली असती तर गाईच्या धडकेमुळे मृत्यू झाला असता.

Vande Bharat : वंदे भारत एक्स्प्रेसच्या खाली आली गाय, चालकाने काय केले पाहा Video
vande bharat
| Updated on: May 19, 2024 | 7:19 AM
Share

वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून लोकप्रिय झाली आहे. राज्यात आठ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत. देशातील अनेक रेल्वे ट्रॅकवर प्राणी फिरत असतात. त्यावेळी अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसला म्हशीची धडक बसल्याची घटना गुजरातमध्ये घडली होती. वंदे भारत एक्स्प्रेस संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे ट्रॅकवर गाडी आली असताना गाय असल्याचे हा व्हिडिओ आहे. मग रेल्वे चालकाने गाडी रिव्हर्स घेऊन त्या गाईचे प्राण वाचवले. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

ट्रेन मागे घेतली अन्…

इंस्टाग्राम अकाउंट @huzaifa4625 वर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये वंदे भारत ट्रेनच्या खाली गाय फसल्याचे दिसत आहे. त्या गाईचे प्राण संकटात आले होते. परंतु वंदे भारतच्या चालकाने तिचे प्राण वाचवले. त्याने वंदे भारत ट्रेन मागे घेतली. ट्रेन मागे घेताच ती गाय आरामात उठून चालायला लागली. परंतु हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, ही माहिती दिली गेलेली नाही.

गाडी थांबवल्यामुळे टळला अपघात

व्हायरल व्हिडिओत ट्रेनच्या खाली फसलेली गाय दिसत आहे. शेजारी एक मालगाडी उभी असल्याचे दिसत आहे. अनेक जण या घटनेचा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस थोडी पुढे गेली असती तर गाईच्या धडकेमुळे मृत्यू झाला असता. तसेच ट्रेनचेही नुकसान झाले असते. परंतु ट्रॅकवर समोर गाय दिसताच लोको पायलटने त्वरीत गाडी थांबवली. त्यामुळे अपघात टळला.

लोकांच्या अशा आल्यात प्रतिक्रिया…

हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, “एक जीव वाचला हे पाहून बरे वाटले.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, ड्रायव्हरने योग्य वेळी ट्रेन थांबवून चांगला निर्णय घेतला. आणखी एक जण म्हणाला, “गाय मृत्यूच्या दारातून परत आली आहे!” एकाने सांगितले की या उदात्त कृत्याने मनाला खूप शांती मिळाली.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.