Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, NDRF च्या 2 टीम दाखल; सतेज पाटलांकडून मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर

माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना नागरिकांना महत्वाचं आवाहन केलंय. तसंच नागरिकांच्या मदतीसाठी आपले संपर्क क्रमांकही जाहीर केलेत.

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, NDRF च्या 2 टीम दाखल; सतेज पाटलांकडून मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर
पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 11:54 PM

कोल्हापूर : राज्यात काही भागात पावसानं थैमान घातलंय. मुंबई, ठाणे, कोकण आणि कोल्हापूर (Kolhapur) परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. कोल्हापुरात सध्या पावसानं उसंत दिली असली तर रात्रीतून पुन्हा मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळला तर पुराची भीती व्यक्त केली जातेय. संध्या पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 6 इंचावर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन टीमही कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना नागरिकांना महत्वाचं आवाहन केलंय. तसंच नागरिकांच्या मदतीसाठी आपले संपर्क क्रमांकही जाहीर केलेत.

गरज असेल तरच घराबाहेर पडा

आज मंगळवार दि. 05 जुलै रोजी सायंकाळी 04 वाजता जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फूट 6 इंच फुटांपर्यंत गेली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. संभाव्य पूरपरिस्थिती च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे सर्व उपायोजना करण्यात आल्या आहेत. माझी सर्व कोल्हापूकरांना विनंती आहे की अतिवृष्टी सदृश पावसामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडावे.

काही सखल व नदीकाठी असलेल्या भागांमध्ये पाणी वाढल्यास प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी तात्काळ स्थलांतरित व्हावे. पूरपरिस्थितीत कोणतीही मदत हवी असल्यास मला, आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांना किंवा अजिंक्यतारा कार्यालयाशी लगेच संपर्क करावा ही विनंती!, असं आवाहन सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना केलंय. त्याचबरोबर त्यांनी आपले संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत.

संपर्क क्रमांक :

1. सतेज (बंटी) पाटील
98230 12905

2. आ. ऋतुराज पाटील
97644 95999

3. आ. जयश्री जाधव
95520 73100

4. अजिंक्यतारा कार्यालय
0231-2653288/89/90

कोल्हापुरात NDRF च्या 2 टीम दाखल

कोल्हापुरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. मात्र, पावसाचा जोर आता काहीसा ओसरल्यानं जिल्हा प्रशासनाला आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान, पुराची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन टीम कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. यातील एक टीम कोल्हापूर तर दुसरी शिरोळ तालुक्यासाठी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. प्रत्येक टीममध्ये 25 जवानांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एनडीआरएफच्या जवानांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती दिली.