Kokan Hapus : ज्याच्या चवीची सर कशालाच नाही, असा आंब्याचा राजा कोकण हापूसला गुजरातकडून चॅलेंज, निकालाकडे सगळ्या कोकणाचं लक्ष

Kokan Hapus : कोकण हापूस विरुद्ध गुजरात वलसाड आंबा वादात कोकणच्या बाजूने प्रसिद्ध वकील हिमांशु काणे यांनी बाजू मांडली होती. त्यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. ॲड काणे यांनी कोकणचा हापूस आणि वलसाडचा आंबा यांतील तांत्रिक आणि वैज्ञानिक फरक पुराव्यानिशी मांडला होता.

Kokan Hapus : ज्याच्या चवीची सर कशालाच नाही, असा आंब्याचा राजा कोकण हापूसला गुजरातकडून चॅलेंज, निकालाकडे सगळ्या कोकणाचं लक्ष
Kokan Hapus Mango
| Updated on: Nov 20, 2026 | 8:33 AM

मनोज लेले, प्रतिनिधी : कोकणचा हापूस आंबा गल्लीपासून दिल्ली पर्यंतच नाही, तर अमेरिकेतही लोकप्रिय आहे. कोकणच्या हापूस आंब्याची चव इतर कुठल्याही आंब्याला येऊ शकत नाही. कोकणचा जसा हापूस आंबा आहे तसचं इतरही आंब्यांची पिकं महाराष्ट्रात आणि देशात घेतली जातात. पण हापूस आंब्याची सर कशालाही नाही. पण आता याच कोकणच्या राजाला हापूस आंब्याला वलसाड गुजरात हापूसने आव्हान दिलं आहे. गुजरातने केलेल्या अर्जावर चेन्नईमध्ये अंतिम सुनावणी पार पडली. GI रजिस्ट्रीमध्ये या खटल्याची सुनावणी सुरु आहे. कोकणच्या हापूस विरुद्ध वलसाड गुजरात हापूस वादात मोठी घडामोड घडली आहे. वलसाड हापूसला वेगळं GI मिळावं, यासाठी गुजरातने चेन्नई GI रजिस्ट्रीमध्ये अर्ज केला आहे. त्यावर अंतिम सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी दरम्यान GI रजिस्ट्रीने दोन्ही बाजूंना एक महत्त्वाची सूचना केलीय. समाजाच्या मोठ्या हितासाठी दोन्ही बाजूंनी तडजोड करावी, सामंजस्याने मार्ग काढावा, असं रजिस्ट्रीने सांगितलंय. सुनावणी संपली असून, आता निकाल राखून ठेवला गेलाय.

चेन्नईमध्ये झालेल्या अंतिम सुनावणीनंतर निकाल राखून ठेवण्यात आलाय. कोकण कृषी विद्यापीठाने आणि हापूस उत्पादक संस्थेने गुजरात वलसाडच्या दाव्याला जोरदार विरोध केलाय.कोकण हापूसचं GI वाचणार की वलसाडला वेगळं GI मिळणार? संपूर्ण कोकणाचं निकालाकडे लक्ष लागलं आहे. 2023 मध्ये भारतीय किसान संघ गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन GI मिळण्यासाठी चेन्नईमध्ये रजिस्ट्रीकडे अर्ज केला होता. कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यांसाठी 2018 मध्ये हापूस हे मानांकन मिळालं होतं. GI म्हणजे गुजरातच्या वलसाडला हापूस हे नाव हवं आहे.

Loading...

हे कोकणच्या शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरेल

इतर कोणत्याही भागातील आंब्याला हापूस हे नाव वापरू देणे हे कोकणच्या शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरेल. पण आता प्रश्न आहे की रत्नागिरी आणि वलसाडमध्ये तडजोड होणार का? की निकालानेच फैसला होणार? कोकणाचं लक्ष आता याकडे लागलं आहे. हापूस वादात तडजोडीचा प्रस्ताव आहे. रजिस्ट्रीचं भांडू नका, तडजोड करावी असं म्हणणं आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली हे कोकण हापूसच्या जीआय मानांकनाचे मुख्य नोंदणीकृत मालक आहेत. निकाल विरोधात गेल्यास सर्वोच्च न्यायालयात हा विषय जाऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us