गणेशोत्सवामुळे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली, रेल्वेने सोडल्या आणखी विशेष गाड्या

रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 325 हून अधिक गाड्या दिल्या आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजन केले. त्यानंतरही कोकणात येणाऱ्या सर्वच ट्रेन हाउसफुल झाल्या आहेत.

गणेशोत्सवामुळे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली, रेल्वेने सोडल्या आणखी विशेष गाड्या
Railway
Jitendra Zavar | Updated on: Sep 09, 2024 | 5:19 PM

गणेशोत्सवामुळे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 325 हून अधिक गाड्या दिल्या आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजन केले. त्यानंतरही कोकणात येणाऱ्या सर्वच ट्रेन हाउसफुल झाल्या आहेत. सहा ते सात लाख लोक ट्रेनने कोकणात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेने अजून पनवेल आणि मडगाव दरम्यान २ अतिरिक्त गणपती उत्सव विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान २ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मडगाव-पनवेल- मडगाव विशेष

  • 01428 विशेष गाडी दि. १५.०९.२०२४ रोजी मडगाव येथून ०९.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २२.१५ वाजता पोहोचेल.
  • 01427 विशेष गाडी दि. १५.०९.२०२४ रोजी पनवेल येथून २३.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल.

या ठिकाणी थांबा

पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकावर गाड्यांना थांबा असणार आहे. त्यासाठी आरक्षण केंद्रावर किंवा www.irctc.co.in या संकेस्थळावर १० सप्टेंबर २०२४ पासून बुकींग सुरु होणार आहे.

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. कोकण रेल्वेमार्गावर सोमवारी काही गणपती स्पेशल गाड्या साडेचार तास उशीराने धावत आहेत. तसेच नियमित धावणाऱ्या गाड्या दिड तास उशीराने धावता आहेत. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होत आहे. कोकणकन्या, तुतारी, सावंतवाडी गणपती स्पेशल, सिंधुदूर्ग एक्सप्रेस गाड्या उशीराने धावत आहे.

रेल्वेप्रमाणे एसटी महामंडळाने अनेक बसेस सोडल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर येथून जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील विविध विभागांतून अतिरिक्त बसेस कोकणात सोडल्या आहेत. तसेच ट्रॅव्हल्स चालकांनी गर्दीचा फायदा घेऊन दरवाढ केली आहे.

Follow Us