Konkan Railway | कोकण रेल्वेची वाहतूक अखेर पूर्वपदावर, तीन तासांनी कोकणकन्या एक्स्प्रेस रवाना

| Updated on: May 15, 2022 | 8:53 AM

Konkan Railway | कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. विलवडे रेल्वे स्थानकात कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये थांबली आहे.

Konkan Railway | कोकण रेल्वेची वाहतूक अखेर पूर्वपदावर, तीन तासांनी कोकणकन्या एक्स्प्रेस रवाना
कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये बिघाड
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

मुंबई : कोकण रेल्वेची (Konkan Railway) विस्कळीत झालेली वाहतूक अखेर पूर्वपदावर आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारासच कोकण रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मुंबईहून निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या (Konkarn Kanya Express) इंजिनमध्ये बिघाड झाला होता. मात्र वेगळं इंजिन लावून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तीन तासांच्या खोळंब्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री निघालेली कोकण कन्या गोव्यापासून जवळपास अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली होती. अनेक गाड्यांचं वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कोकणकन्याच्या इंजिनमध्ये बिघाड

सकाळी पाच वाजताच्या सुमारास कोकण कन्याच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे विलवडे रेल्वे स्थानकात कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये थांबली होती. सकाळच्या वेळेस जवळपास तीन तासांपासून कोकण रेल्वेची सेवा कोलमडली होती. अखेर नव्या इंजिनच्या मदतीने कोकण कन्या एक्स्प्रेस रेल्वे स्थानकात आणण्यात आली.

दोन तासांपासून थांबून

कोकण कन्या एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटते. पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास रत्नागिरी सोडल्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकाच्या दिशेने कोकण कन्याचा प्रवास सुरु होते. मात्र त्याच वेळी गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं. त्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकाजवळ कोकणकन्या दोन तासांपासून थांबून होती.

हे सुद्धा वाचा

मुंबईहून रात्री निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस गोव्यातील मडगांव रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास पोहोचते. मात्र तीनपेक्षा अधिक तासांपासून रखडलेली ही गाडी आता कधी पोहोचणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी सुट्ट्या आटपून मुंबईच्या दिशेने परत येणाऱ्या प्रवाशांची रखडपट्टी झाली आहे.

कोकण रेल्वे विस्कळीत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात ही धाकधूक कायमच असते. पावसाळ्यात अनेक वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या इंजिनमधील बिघाड असल्यामुळे तो कमी कालावधीत दुरुस्त होण्याची चिन्हं आहेत