कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला अखेर सरकारी नोकरीत नियुक्ती

अहमदनगर : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला शासकीय सेवेत नोकरी मिळाली आहे. कोपर्डी बलात्काराची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाप्रमाणे पीडितेच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात आली. कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला महसूल विभागात नोकरी देण्यात आली आहे. ते कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात शिपाईपदावर शुक्रवारी रुजू …

कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला अखेर सरकारी नोकरीत नियुक्ती

अहमदनगर : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला शासकीय सेवेत नोकरी मिळाली आहे. कोपर्डी बलात्काराची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाप्रमाणे पीडितेच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात आली.

कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला महसूल विभागात नोकरी देण्यात आली आहे. ते कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात शिपाईपदावर शुक्रवारी रुजू देखील झाले आहेत. कोपर्डीत 13 जुलै 2016 ला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणानंतर राज्यासह देश हादरला होता. अनेक मोर्चे आणि निदर्शने देखील करण्यात आले. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं आणि मदत देखील केली होती. मात्र यावेळी प्रकरण घडले तेव्हा कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानुसार शुक्रवारी निर्भयाच्या भावाला कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात शिपाईपदावर रुजू करण्यात आलं.

कोपर्डी बलात्कार प्रकरणी अहमदनगर जिल्हा न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक मोर्चेही काढण्यात आले. सरकारच्या वतीने ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. कोर्टाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *