Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, आदिती तटकरेंनी दिली सर्वात मोठी बातमी

लाडक्या बहिणींची अखेर प्रतिक्षा संपली आहे, लाभार्थी महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून, मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, आदिती तटकरेंनी दिली सर्वात मोठी बातमी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2025 | 3:47 PM

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, लाडकी बहीण ही एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होतात. मात्र ऑगस्ट महिना उलटून गेला तरी देखील ऑगस्ट महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळाले नव्हते, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान याबाबत आता मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत अत्यतं महत्त्वाची माहिती दिली आहे, सर्व लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी आजपासून वितरणाला सुरुवात होईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमकं काय म्हटलं आदिती तटकरे यांनी?  

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.’ अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे.

 

दरम्यान लाडकी बहीण ही योजना सुरू करत असताना काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या, जसं की ज्या कुटुंबाच आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच ज्या महिलांचं वय 65 पेक्षा जास्त असेल त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, एका कुटुंबातील केवळ दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र अनेक ठिकाणी अटीत न बसताही काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, आता अशा महिलांचं नाव या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे.