Latur District Central Co-Operative Bank Ltd Election Result Update : लातूर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत भाजपला धक्का, रितेश देशमुखांच्या बंधुंनी मारली बाजी
Latur District Central Co-Operative Bank Ltd Election Result Update : आज लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल येणार आहेत. मतमोजणी सुरु आहे. निकालाचा कल पाहता भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना फटका बसताना दिसतोय.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुकांकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. काही जिल्हा बँकांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. तिथे महायुतीशी संबंधित पॅनलने बाजी मारली. आज लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल येणार आहेत. लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सहकार पॅनेल आणि परिवर्तन पॅनल या दोन पॅनेलमध्ये थेट लढत होते आहे. आज दुपार पर्यंत लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल हाती येईल. सहकार पॅनेलचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख करीत आहेत तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे करीत आहेत. 15 जागांसाठी 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 999 पैकी 993 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
आतापर्यंत जे निकाल हाती आलेत, त्यात सहकार पॅनलने सहा तर परिवर्तन पॅनलने तीन जागा जिंकल्या आहेत. सहकार पॅनेलचे प्रमुख धीरज देशमुख 13 मतांनी विजयी झालेत. परिवर्तन पॅनलचे अरविंद पाटील निलंगेकर विजयी झाले आहेत. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे ते बंधू आहेत.
अनेक वर्षांपासून लातूर जिल्हा बँक ही देशमुख कुटुंबीयांच्या ताब्यात
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विजयी झाले आहे. धीरज देशमुख यांनी या सहकार पॅनलचे नेतृत्व केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून लातूर जिल्हा बँक ही देशमुख कुटुंबीयांच्या ताब्यात आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील धीरज देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा देत मदत केली होती. तर महायुतीच्या चार आमदारांनी या निवडणुकीसाठी ताकद लावली होती. लातूर जिल्हा बँक या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस प्रणित सहकार पॅनलकडेच राहिली आहे.
सहकार पॅनल विजयी उमेदवार
हेमंत जाधव ,लातूर
प्रीती भोसले, उदगीर
आशिष पाटील राजूरकर,जळकोट
संतोष पाटील, चाकुर
धीरज देशमुख,
जगन्नाथ पाटील
जयेश माने
सर्जेराव मोरे
विवेक सिरसाठ
अविनाश जाधव
परिवर्तन पॅनल विजयी उमेदवार
अरविंद पाटील निलंगेकर
अतुल गंभीरे
भगवानराव पाटील तळेगावकर
ऋषिकेश कराड
शोभा पवार