VIDEO | रोड रोलरखाली कर्कश्श हॉर्न आणि सायलेन्सर चिरडले, लातूर पोलिसांचा धमाका

| Updated on: Mar 25, 2021 | 5:20 PM

लातूर वाहतूक पोलिसांनी बाईक ताब्यात घेऊन त्यांचे हॉर्न आणि सायलेन्सर चिरडून टाकले आहेत. (Latur Police horn Road Roller)

VIDEO | रोड रोलरखाली कर्कश्श हॉर्न आणि सायलेन्सर चिरडले, लातूर पोलिसांचा धमाका
Follow us on

लातूर : कर्कश्श आवाज करत रस्त्यांवरुन धावणाऱ्या जवळपास 300 बाईक्सवर लातूर पोलिसांनी कारवाई केली. कर्कश्श फायरिंगसाठी लावण्यात आलेले सायलेन्सर वाहतूक पोलिसांनी चक्क रोड रोलरखाली चिरडले. (Latur Police Destroys loud horn under Road Roller)

कर्कश्श हॉर्न आणि कानाला त्रास होईल, असे सायलेन्सर काढून टाकण्याचे आवाहन करुनही अनेक दुचाकीस्वार आपल्या बाईकला मोठा आवाज असणारे सायलेन्सर लावून लातूर शहरात फिरत होते. दवाखाना, शाळा, सरकारी कार्यालये, बाजारपेठ अशा सगळ्या ठिकाणी कर्कश्श आवाजाच्या बाईक उडवत अनेक जण फिरत होते.

वाहतूक पोलिसांनी आता या बाईक ताब्यात घेऊन सायलेन्सर चक्क चिरडून टाकले आहेत. काढून टाकलेले सायलेन्सर पुन्हा विकले जाऊ लागल्याने सायलेन्सर चिरडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

पाहा व्हिडीओ :

नागपुरात फॅन्सी नंबर प्लेटवाले रडारवर

गेल्या काही दिवसांपासून गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा एक ट्रेंड सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. नागपूर वाहतूक पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनधारकांविरोधात कारवाईची जोरदार मोहीम सुरु केली होती. शहराच्या वेगवेगळ्या भागातील वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

दादा, मामा, काका, साई, राम, पवार अशा नावांचे नंबर जुळवलेली वाहनं वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात, मात्र आपणसुद्धा असं वाहन वापरत असाल तर आताच सावधान व्हा, कारण ज्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेट फॅन्सी आहेत, अशा वाहन चालक अन् दुचाकीस्वारांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी खास मोहीम उघडली आहे. बऱ्याच जणांवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. ज्यांच्यावर आधी कारवाई झालेली आहे, तरीसुद्धा ज्यांनी नंबर प्लेट्स बदललेल्या नाहीत, अशा लोकांची वाहनंही जप्त करण्यात आलेली आहेत.

फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट शहरात वाढल्यानंतर यासंदर्भात अनेक तक्रारी नागपूर पोलीस विभागाला प्राप्त झाल्या. अशा वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्या्च्या दृष्टिकोनातून एक मोहीम सुरू करण्याच्या विचारात वाहतूक पोलीस होते.

संबंधित बातम्या :

फॅन्सी नंबर प्लेटवाले पुन्हा ट्रॅफिक पोलिसांच्या रडारवर

(Latur Police Destroys loud horn under Road Roller)